ED Raid : ‘आमच्याकडे मसाला तयार, आम्ही दणका देणार’, ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा थेट इशारा; भाजपवर हल्लाबोल

ED Raid : 'आमच्याकडे मसाला तयार, आम्ही दणका देणार', ईडीच्या धाडीनंतर नाना पटोलेंचा थेट इशारा; भाजपवर हल्लाबोल
नाना पटोले यांची ईडी कारवाईवरुन भाजपवर टीका
Image Credit source: TV9

'सौ सोनार की एक लोहार की, आमच्याकडे मसाला तयार आहे, आम्ही दणका देणार', असा शब्दात पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिलाय. भाजप जे कटकारस्थान रचत आहे त्याविरोधात मोहीम आखणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितलं.

सागर जोशी

|

Mar 31, 2022 | 1:13 PM

मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर गुरुवारी सकाळी अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीने धाड टाकली. पाच तास चाललेल्या धाडीनंतर सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. यावरुन आता नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेत भाजप आणि पंतप्रधान मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार निशाणा साधलाय. ‘सौ सोनार की एक लोहार की, आमच्याकडे मसाला तयार आहे, आम्ही दणका देणार’, असा शब्दात पटोले यांनी भाजपला थेट इशारा दिलाय. भाजप जे कटकारस्थान रचत आहे त्याविरोधात मोहीम आखणार असल्याचंही पटोले यांनी यावेळी सांगितलं.

‘भाजप देशात हुकुमशाही आणतंय’

ईडीच्या कारवाईनंतर नाना पटोले आक्रमक झाले आहेत. ही अघोषीत आणीबाणी असून त्याविरोधात उद्रेक होणं निश्चित आहे. भाजप देशात हुकुमशाही आणतंय. भाजप आणि मोदींविरोधात आवाज उठवणाऱ्यांवर ईडीच्या धाडी सुरु आहेत. आम्ही केंद्रीय तसाप यंत्रणांविरोधात रणनिती आखणार. भाजप स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. पण लोकशाहीत जनता मोठी असते, हे भाजपला कळायला हवं. आता जनताच त्यांना धडा शिकवेल, अशा शब्दात पटोले यांनी भाजपवर निशणा साधलाय. दरम्यान, संजय राऊत यांनी आता ईडीच्या धाडी गंमतीचा विषय बनला आहे. नाना पटोले यांच्यावरही ईडीची धाड पडल्यास आश्चर्य वाटायला नको, असा टोला भाजपला लगावलाय. त्याबाबत विचारलं असता, माझ्यावर धाड पडली तर मी त्यांचं स्वागत करणार. कर नाही त्याला डर कशाला, अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिलीय.

पटोलेंचं सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाला आवाहन

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश आणि उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश यांना मी तुमच्या माध्यमातून विनंती करतो की, या सगळ्या लोकतंत्राला वाचवण्यासाठी आपण हस्तक्षेप करुन सुमोटो याचिका दाखल करावी. जेणेकरून ही लोकशाही वाचवण्यात आपल्याला यश येईल. नाहीतर भाजपच्या हिटलरशाहीनं लोकशाही आता धोक्यात आली असल्याचंही पटोले यावेळी म्हणाले.

ट्विटरवरुन पटोलेंचा मोदींवर निशाणा

UPA अध्यक्षपदावरुन राष्ट्रवादीला टोला

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून UPA अध्यक्षपदी शरद पवार यांची नियुक्ती करण्यात यावी असा ठराव मंजूर करण्यात आलाय. त्याबाबत बोलताना पटोले यांनी राष्ट्रवादीला टोला हाणलाय. ‘आम्ही वारंवार सांगितलं की त्यांच्या पक्षात चर्चा होणं स्वाभाविक आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस आहे आणि भाजपला पर्याय म्हणूनही काँग्रेसच आहे. UPA चं अध्यक्षपद काँग्रेसच ठरवेल. आज भाजपविरोधात कसं लढायचं ही वेळ आहे. कोण UPA चा अध्यक्ष होणार किंवा नाही होणार ही वेळ नाही’, असं पटोले म्हणाले.

इतर बातम्या :

Ajit Pawar | मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट्स; Satish Uke प्रकरणी अजित पवारांची सावध प्रतिक्रिया

‘नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही, ईडी आता गमतीचा विषय’, संजय राऊतांचा खोचक टोला, भाजपवर हल्लाबोल

‘शरद पवार भीष्म पितामह, UPA कुणाची खासजी जागीर नाही’, संजय राऊतांनी पुन्हा काँग्रेसला डिवचलं! वाद पेटणार?

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें