‘नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही, ईडी आता गमतीचा विषय’, संजय राऊतांचा खोचक टोला, भाजपवर हल्लाबोल

'नाना पटोलेंवर धाडी पडल्या तरी आश्चर्य नाही, ईडी आता गमतीचा विषय', संजय राऊतांचा खोचक टोला, भाजपवर हल्लाबोल
संजय राऊत
Image Credit source: TV9

आता मी नागपूरला गेलो होतो, त्यावेळी मला सतीश उके (Satish Uke) मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी बऱ्याचं गोष्टी मला सांगितल्या. ज्यांच्यावरती आरोप केले जात आहेत. ज्यांच्याविषयी माहिती दिली जात आहे. त्यांच्या भ्रष्टाचारावरती कारवाई होत नाही आणि जे माहिती देत आहेत. म्हणजे व्हिसल ब्लोअर (Whistle Blower) आहेत. त्यांच्यावरती महाराष्ट्रात सातत्याने कारवाई केली जात आहे.

संदीप राजगोळकर

| Edited By: महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 31, 2022 | 10:22 AM

दिल्ली – आता मी नागपूरला गेलो होतो, त्यावेळी मला सतीश उके (Satish Uke) मला भेटले होते. त्यावेळी त्यांनी बऱ्याचं गोष्टी मला सांगितल्या. ज्यांच्यावरती आरोप केले जात आहेत. ज्यांच्याविषयी माहिती दिली जात आहे. त्यांच्या भ्रष्टाचारावरती कारवाई होत नाही आणि जे माहिती देत आहेत. म्हणजे व्हिसल ब्लोअर (Whistle Blower) आहेत. त्यांच्यावरती महाराष्ट्रात सातत्याने कारवाई केली जात आहे. खरं म्हणजे हा एक गंमतीचा विषय आहे. आता चितेंचा विषय राहिलेला नाही. चिंता करावी असा विषय राहिलेला नाही. तर गंमत करावी आणि गंमत पाहावी असा विषय झालेला आहे असं संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं.

भविष्यात नाना पटोले यांच्यावरती धाडी पडल्या तरी मला आच्छर्य वाटणार नाही

आम्ही सुध्दा व्यवस्थित संदर्भात जिथे माहिती द्यायची आहे, तिथे दिली आहे. पण आम्ही दिलेल्या एकाही कागदपत्रावर किंवा पुराव्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी आणि प्रधानमंत्री कार्यालयाने अद्याप कारवाई केलेली नाही. म्हणून तर मी म्हणतो हा गमतीचा विषय आहे . चिंतेचा विषय नाही. आज मी नागपूरातल्या धाडीविषयी माहिती पाहिली. मला अनेकांनी नागपूरातून फोन केले. अनेक पत्रकारांनी फोन केले. काही वकिलांनी फोन केले. भविष्यात नाना पटोले यांच्यावरती धाडी पडल्या तरी मला आच्छर्य वाटणार नाही. कारण ते नाना पटोले यांचे वकील आहेत. या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात घडत राहतील. विरोधी पक्षातील नेते म्हणतात कर नाही त्याला डर कशाला किंवा सगळं काही कायद्याने होत आहे. तुम्ही जे केलेलं कृत्य आहे त्याचे आम्ही पुरावे दिले आहेत. त्यावर एजन्सी कारवाया का करत नाही. हा सत्याचा आणि न्यायाचा जो तराजू आहे तो चोर बाजारातील तराजू आहे. पण शेवटी तराजू हा असा सरळ पाहिजे. ज्यांनी गुन्हे केले आहेत त्यांच्यावरती कारवाई व्हायला. कायदा सगळ्यांसाठी सारखा आहे अशी टीका संजय राऊत यांनी भाजपवरती केली.

महाराष्ट्रात विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून झुंड शाही आणि अराजक निर्माण करत आहे

महाराष्ट्राच्या बाबतीत किंवा जिथल्या राज्यात भाजपाचे मुख्यमंत्री नाहीत. तिथं हा तराजू एका बाजून कलेला आणि झुकलेला दिसतो. महाराष्ट्रात विरोधी पक्ष केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून झुंड शाही आणि अराजक निर्माण करत आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर हा पाळलेल्या गुंडासारखा कोणी करत असेल. तर ते संघराज्य व्यवस्थेला अत्यंत घातक आहे. मी युपीए संदर्भात उद्धव ठाकरेशी बोलणार आहे. काँग्रेस पक्षाचं नेतृत्व कुणी करावं त्यांचा अतंर्गत प्रश्न आहे. काँग्रेस पक्षानं युपीएसाठी प्रयत्न करावे. तसेच युपीए कुणाची खाजगी जहागीर नाही. सध्या ज्या पध्दतीने महाराष्ट्रात महागाई वाढलेली त्याविरोधात भाजपाने रस्त्यावर उतरायला हवं असा खोचक टोला संजय राऊत लगावला.

Who is Satish Uke: कोण आहेत नागपुरचे सतीश उके ज्यांच्यावर ED ने धाड टाकलीय

Video : साताऱ्यात धामण जुळ्यांचा थरारक खेळ, सापांना पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी

नव्या आर्थिक वर्षात होणार मोठे फेरबदल; घरे, औषधांच्या दरामध्ये होणार वाढ; PF चे नियम देखील बदलणार


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें