Who is Satish Uke: कोण आहेत नागपुरचे सतीश उके ज्यांच्यावर ED ने धाड टाकलीय

Who is Satish Uke: कोण आहेत नागपुरचे सतीश उके ज्यांच्यावर ED ने धाड टाकलीय
सतीश उके

वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने धाड (ED Raid) टाकल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळपासूनच उके यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु आहे. मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

गजानन उमाटे

| Edited By: अजय देशपांडे

Mar 31, 2022 | 9:55 AM

नागपूर : वकील सतीश उके (Satish Uke) यांच्या घरावर ईडीने धाड (ED Raid) टाकल्याची बातमी समोर आली आहे. आज सकाळपासूनच उके यांच्या नागपुरातील निवासस्थानी अंमलबजावणी संचलनालयाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुरु आहे. मात्र ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात सुरु आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. यावेळी उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त पहायला मिळत आहे. ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवली होती. सतीश उके यांना हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखलं जातं. अनेक मोठ्या प्रकरणात त्यांनी युक्तिवाद केला आहे. सतीश उके यांच्या घरावर ईडीने धाड टाकण्याने उके पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत.

कोण आहेत सतीश उके?

सतीश उके जिल्हा आणि उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस करतात. सतीश उके हे नागपुरचे हायप्रोफाईल वकील आहेत. त्यांनी अनेक वेळा उच्च न्यायालयात पीआयएल दाखल केल्या आहेत. ॲड. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. तेव्हापासून उके हे सतत या ना त्या कारणांमुळे चर्चेत आहेत. उके यांनी फोन टॅपिंग प्रकरणात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने देखील केस लढवली होती. सतीश उके यांची राजकीय वर्तळात उठबस आहे. त्यांचे राज्यातील अनेक नेत्यांशी जवळचे संबंध असल्याचे बोलले जाते. सतीश उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती. सतीश उके यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात भूमिका घेतली होती. तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात त्यांनी केस लढवली आहे. सतीश उके यांना महाविकास आघाडीशी जवळीक भोवली का? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

जमीन व्यवहाराप्रकरणी छापा?

सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचलनालयाने धाड टाकली आहे. पार्वती नगर भागातील निवासस्थानी आज पहाटे 5 वाजताच्या सुमारास ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. सध्या ॲड सतिश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके घरी आहेत. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

संबंधित बातम्या

Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत

Kolhapur North : काँग्रेसवाले बिचारी म्हणून मतं मागतील, पण ज्याचं काम त्यानं करावं, महाडिकांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

‘कितीही मोर्चेबांधणी करा, येणार तर मोदीच’, चंद्रकांत पाटलांचा विरोधकांवर निशाणा, UPA अध्यक्षपदावरुन टोलेबाजी

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें