Kolhapur North : काँग्रेसवाले बिचारी म्हणून मतं मागतील, पण ज्याचं काम त्यानं करावं, महाडिकांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक

काँग्रेसने मात्र या जागेवर चंद्रकांत जाधवांच्या पत्नी जयश्री जाधव यांनाच उमेदवारी दिली. आता त्याच उमेदवारीवरून भाजप काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवत आहे. भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahdik) यांचं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

Kolhapur North : काँग्रेसवाले बिचारी म्हणून मतं मागतील, पण ज्याचं काम त्यानं करावं, महाडिकांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस आक्रमक
धनंजय महाडिक यांचं वक्तव्य व्हायरलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Mar 30, 2022 | 11:28 PM

कोल्हापूर : काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव (Chandrakant jadhav) यांच्या मृत्युमुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यानंतर आता त्या जागेवर पोटनिवडणूक (Kolhapur north Assembly Election) लागली आहे. कोल्हापुरात सध्या प्रचारतोफा धडाडत आहेत. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. आधी भाजपने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना भाजपकडून लढण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती ऑफर नारल्याने भाजपने दुसरा उमेदवार दिला. काँग्रेसने मात्र या जागेवर चंद्रकांत जाधवांच्या पत्नी जयश्री जाधव यांनाच उमेदवारी दिली. आता त्याच उमेदवारीवरून भाजप काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवत आहे. भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahdik) यांचं एक वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्यांनी महिलांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केल्याचा आरोप सध्या सोशल मीडियातून होतोय.

धनंजय महाडिक व्हिडिओत काय म्हणाले?

या व्हिडिओत महाडिक म्हणत आहेत, “काँग्रेसचे लोक आता येतील आणि सांगतील एक महिला आम्ही उभा केली आहे. तुम्ही सगळ्या महिला आहेत. ती बिचारी आहे, तिला मतदान करा. पण मला सांगा तुमच्या कुटुंबातील तुमचा पती एखादा प्लंबर असेल तर ते काम उद्या तुम्हाला जमणार आहे का? तुमचा एकादीचा नवरा इलेक्ट्रीशन असेल तर ते काम उद्या तुम्हाला जमणार आहे का? ज्याचं कामं त्याने करायचं असतंय”, असे म्हणताना महाडिक या व्हिडिओत दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

सोशल मीडियावर महाडिकांवर टीका

महाडिकांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत महाडिक यांच्यावर जोरदार टीका होत आहे. तुमच्या बुरसटलेल्या विचारांमुळेच तुम्हा कोल्हापुरातील जनतेने घरी बसवले आहे. ताराराणींच्या कोल्हापुरात नारीशक्तिला कमी लेखणाऱ्यांचा धिक्कार असो, अशा आशयाचा मजकूर या व्हिडिओबरोबर सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. सुरूवातील ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न सतेज पाटील यांनी केला मात्र त्यांना यश आलं नाही. आणि आता या व्हिडिओमुळे या प्रकरणात नवं ट्विस्ट आलंय. धनंजय महाडिकांच्या वक्तव्याला आणि सोशल मीडियावरच्या टीकेला कोल्हापूरचे मतदार कसा प्रतिसाद देतात? हे येणाऱ्या काळात निवडणुकीचे निकालच सांगतील.

कल्याण पंचायत समितीत भाजपाच्या रेश्मा भोईर यांची सभापती पदी बिनविरोध निवड

नाणारला टोकाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेनं भूमिका का बदलली? नितेश राणेंचा सवाल, 7/12 तपासण्याचाही इशारा

स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, Anil Bonde यांचा शरद पवार यांच्यावर घणाघात

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.