नाणारला टोकाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेनं भूमिका का बदलली? नितेश राणेंचा सवाल, 7/12 तपासण्याचाही इशारा

नाणारला टोकाचा विरोध करणाऱ्या शिवसेनेनं भूमिका का बदलली? नितेश राणेंचा सवाल, 7/12 तपासण्याचाही इशारा
नितेश राणे, आमदार, भाजप
Image Credit source: TV9

रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये उभारण्यास जोरदार विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका का बदलली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी केलाय. तसंच शिवसेनेनं हा प्रकल्प बारसूला उभारण्यास परवागनी दिली, हा संशोधनाचा विषय असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलंय.

मनोज लेले

| Edited By: सागर जोशी

Mar 30, 2022 | 9:53 PM

सिंधुदुर्ग : नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प (Refinery Project) उभारण्यास स्थानिकांसह शिवसनेकडून जोरदार विरोध झाला. त्यामुळे केंद्रानं हा प्रकल्प काहीसा बाजूला ठेवल्याचं चित्र आजवर पाहायला मिळालं. मात्र, या प्रकल्पाला असलेल्या शिवसेनेचा विरोध मावळल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, या प्रकल्पाची जागा बदलून तो आता राजापूर तालुक्यातील बारसू इथं उभारण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून देण्यात आलाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना जानेवारीमध्येच पत्र लिहिल्याची माहिती समोर आलीय. मात्र, रिफायनरी प्रकल्प नाणारमध्ये उभारण्यास जोरदार विरोध करणाऱ्या शिवसेनेची भूमिका का बदलली? असा सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलाय. तसंच शिवसेनेनं हा प्रकल्प बारसूला उभारण्यास परवागनी दिली, हा संशोधनाचा विषय असल्याचंही नितेश राणे यांनी म्हटलंय.

रिफायनरी प्रकल्प कोकणातच होणार हे आम्ही पहिल्यापासून सांगतोय. नाणारमध्ये हा प्रकल्प होण्यास शिवसेनेच्या विरोधाला काही कारण असू शकतं. राज्य सरकारच्या माध्यमातून आता बारसूचा प्लॅन आला आहे. मात्र, सगळे विषय केंद्र सरकारकडे जाणार आहेत. त्यामुळे केंद्राकडून यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. बारसूला शिवसेनेनं परवानगी का दिली हा संशोधनाचा विषय आहे. टोकाचा विरोध असणाऱ्या शिवसेनेची भूमिका का बदलली? स्वत:च्या खासदारांच्या तोंडाला शिवसेनेनं काळं फासलं, अशी जोरदार टीका नितेश राणे यांनी केलीय.

शिवसेनेला इशारा, आदित्य ठाकरेंना टोला

नितेश राणे यांनी शिवसेनेला इशाराही दिलाय. नवीन प्रस्तावात शिवसेनेकडून गौडबंगाल असल्याचा आरोप करत आम्ही 7/12 तपासून पाहून लवकरच खुलासा करु. अभ्यास करून योग्यवेळी अजून एक पेनड्राईव्ह काढला जाईल, असं नितेश राणे म्हणाले. कधीच न आलेले पर्यटनमंत्री आज आले त्यामुळे पर्यावरण खराब होणारच, असा टोलाही नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंना लगावलाय.

मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्रं

नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प करण्यास नाणारवासियांनी विरोध केला होता. प्रकल्पाच्या विरोधात नाणारवासियांनी मोठं आंदोलन उभारलं होतं. त्यानंतर हा प्रकल्प कोकणातच इतर ठिकाणी करण्यासाठी जागेची शोधाशोध सुरू झाली होती. त्यानुसार बारसू आणि सोलगाव या दोन गावातील जागांचा पर्याय सांगण्यात आला. त्यापैकी बारसूच्या जागेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना 12 जानेवारी रोजी पत्रं लिहून या गावात प्रकल्प करता येणार असल्याचं सांगितलं आहे.

बारसूतच प्रकल्प का?

बारसूत प्रकल्प का केला जावा याबाबतची माहिती या पत्रात देण्यात आली आहे. त्यासाठीची कारणंही दिली आहेत.

> बारसूतील 13 हजार एकर जागा प्रकल्पाला दिली जाऊ शकते.
>> क्रूड ऑईल टर्मिनलसाठी नाटे गावात 2 हजार 144 एकर जागा देणार
>> रिफायनरीला दिली जाणारी बारसूतील 90 टक्के जागा पडीक
>> पडीक जागा असल्याने वाड्या वस्त्यांच्या स्थलांतराचा प्रश्नच नाही
>> आरआरपीसीएल टीमचाही प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद आहे
>> उद्योग मंत्र्यांसह सरकारच्या प्रतिनिधींचा बारसूतील स्थानिकांशी संवाद झाला आहे

इतर बातम्या : 

स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, Anil Bonde यांचा शरद पवार यांच्यावर घणाघात

AAP In Mumbai: गली गली मे शोर है, बीजेपीवाले चोर है, दरेकरांच्या राजीनाम्यासाठी ‘आप’नं मुंबई दणाणून सोडली

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें