स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, Anil Bonde यांचा शरद पवार यांच्यावर घणाघात

स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, Anil Bonde यांचा शरद पवार यांच्यावर घणाघात
भाजपचे नेते अनिल बोंडे
Image Credit source: tv 9

यूपीएच्या कोणत्याच घटकांनी शरद पवार यांना आमंत्रण दिले नाही. प्रस्तावही दिला नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) पोरांना हाताशी धरलं. स्वतःच्या उपस्थितीत त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि टाळ्याही वाजवल्या, असंही अनिल बोंडे म्हणाले.

स्वप्नील उमप

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 30, 2022 | 9:03 PM

अमरावती : राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांनी (Sharad Pawar) स्वतःचीच आरती स्वतःच ओवाळून घेतली, अशी टीका भाजपचे माजी मंत्री अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. मुंडावना बांधून नवरदेव सजला आहे. घोड्यावरही बसले आहेत. आता यूपीएचे घटक या नवरदेवाला स्वीकारतील का..?, असा सवाल अनिल बोंडे यांनी उपस्थित केला. यूपीएच्या अध्यक्षपदावरून भाजप नेते अनिल बोंडेंची शरद पवारांवर ही टीका केली. यूपीएच्या कोणत्याच घटकांनी शरद पवार यांना आमंत्रण दिले नाही. प्रस्तावही दिला नाही. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (NCP Youth Congress) पोरांना हाताशी धरलं. स्वतःच्या उपस्थितीत त्यांनी प्रस्ताव तयार केला आणि टाळ्याही वाजवल्या, असंही अनिल बोंडे म्हणाले.

काँग्रेसचे नेते पवारांना स्वीकारणार काय

काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, नाना पटोले हे शरद पवारांना स्वीकारणार का, असा प्रश्न अनिल बोंडे यांनी उपस्थित केला. ममता बॅनर्जी, प्रशांत किशोर यांच्या मार्फत फिल्डिंग लावून काहीही करून मला नवरदेव करा, असंच काहीस शरद पवारांच म्हणणंय. काहीही करून 80 व्या वर्षात मला नवरदेव करा, अशीच काहीशी परिस्थिती शरद पवार यांची झाली आहे.

मान न मान मैं तेरा मेहमान

कोणी काही म्हणो वा न म्हणो, मान न मान मैं तेरा मेहमान या म्हणी प्रमाणे शरद पवारांनी स्वतःची आरती ओवाळून घेतली आहे. शरद पवारांनी खूप प्रयोग करून पाहिले. गोव्यात ते नोटाच्या पलीकडे पोहचू शकले नाहीत. ममता बॅनर्जी, मुलायमसिंगसह इतर नेत्यांसोबत शरद पवार कशी मोट बांधतात हे पाहावे लागणार आहे. काँग्रेसशिवाय मोट बांधतील का हेही पाहावे लागेल, असा खरपूस समाचार अनिल बोंडे यांनी शरद पवार यांचा घेतला.

Amit Shaha In LS: मी असं विधेयक महाराष्ट्रासाठी आणू शकत नाही, केजरीवालांना उत्तर देताना शहांचा तीन राज्यांचा दाखला

Babanrao Lonikar Audio Clip : इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन, बबनराव लोणीकरांची इंजिनिअरला धमकी, भाजपची अडचण?

Babanrao Lonikar Audio Clip : माजलात का तुम्ही, बबनराव लोणीकरांचा तोल गेला; अभियंत्याला शिवीगाळ? ऑडिओ क्लिप व्हायरल

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें