AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babanrao Lonikar Audio Clip : इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन, बबनराव लोणीकरांची इंजिनिअरला धमकी, भाजपची अडचण?

मीटर काढण्यापासून सुरू झालेलं प्रकरण थेट ईडी (ED Raid) आणि इनकम टॅक्सच्या (Income Tax Raid) धाडीपर्यंत पोहोचले आहे. या अभियंत्याला शिवीगाळ करातनाच लोणीकर यात त्याला इनकम टॅक्सच्या धाडीचीही धमकी देताना दिसत आहेत.

Babanrao Lonikar Audio Clip : इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन, बबनराव लोणीकरांची इंजिनिअरला धमकी, भाजपची अडचण?
बबनराव लोणीकर यांच्या कथित ऑडिओ क्लिपनं नवा वाद पेटला
| Edited By: | Updated on: Mar 30, 2022 | 7:16 PM
Share

औरंगाबाद : भाजप आमदार बबनराव लोणीकर (Babanrao lonikar Audio Clip) यांच्या नावान वीज अभियंत्याला शिवीगाळ करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. मात्र या ऑडिओ क्लिपने आता भाजपची अडचण होण्याची शक्यता आहे. कारण हे मीटर काढण्यापासून सुरू झालेलं प्रकरण थेट ईडी (ED Raid) आणि इनकम टॅक्सच्या (Income Tax Raid) धाडीपर्यंत पोहोचले आहे. या अभियंत्याला शिवीगाळ करातनाच लोणीकर यात त्याला इनकम टॅक्सच्या धाडीचीही धमकी देताना दिसत आहेत. आधीच राज्यात सुरू असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईवरून महाविकास आघाडी भाजपवर सतत आरोप करत आहे. बिगर भाजपशासित राज्यातली सरकार पाडण्याचा आणि दबाव आणण्याचा डावा आहे, असे आरोप या यंत्रणावरून होत आहेत. केद्रीय तपास यंत्रणांना मुख्यमंत्री तर ईडी आहे की भाजपचा घरगडी आहे? असे म्हणताना दिसून आले. आत्ताच्या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये पुन्हा केंद्रीय तपास यंत्रणाचा उल्लेख आल्याने पुन्हा राजकारण पेटण्याची शक्यता आहे. राज्यात भाजप नेते किरीट सोमय्या आणि इतर नेतेही महाविकास आघाडीचे डझनभर नेते आत जाणार असल्याची भाकीतं वर्तवत असतात.

अधिकाऱ्याला नेमकी धमकी काय?

अधिकाऱ्याला खडसावताना लोणीकर म्हणतात, उद्या येऊन बघा ना मीटर काढून नेला की नाही? तुमच्या कुणीतरी नालायक लोकांनी नेलं असेल तुम्हाला काय माहिती. राजाला दिवाळी काय माहिती तुम्हाला. आम्ही पैसे भरणारे लोक आहोत…सूड उगवू नका. आयकर इन्कम टॅक्सच्या धाडी टाकीन. तुम्ही काय काय प्रॉपर्टी घेतली, कुठं कुठं पैसे कमावले. तुम्ही काय करता आम्ही कुंडल्या ठेवतो तुमच्या. आमच्या नादी लागू नका…आमच्या नादी लागायचं नाही. आम्हाला सांगा एक फोन करा आम्ही पैसे भरायला तयार असतो. आम्ही कधीही पैसे बुडवणारे लोक नाहीयेत, अशा आशयाचा ऑडिओ सध्या व्हायरल झाला आहे.

सभागृहातही गदारोळ

आता फक्त लोणीकरच नाही तर याआधीही भाजप नेते खुले आम सीबीआय, ईडी, इनकम टॅक्सची धमकी देताना दिसून आले आहेत. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार तर एकदा सभागृहात महाविकास आघाडीच्या नेत्यांना जास्त बोलू नका नाहीतर तुमचा अनिल देशमुख होईल म्हणताना दिसून आले होते. त्यावरून सभागृहात बराच गदारोळही झाला होता.

मुख्यमंत्र्यांचे सचिव नार्वेकर यांनाही धमकी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना एका अज्ञात व्यक्तीकडून व्हॉट्सअपवर धमकी मिळाल्याचा आरोप झाला होता. आपल्या मागण्या पूर्ण न केल्यास ईडी, एनआयए आणि सीबीआयची चौकशी करायला लावू, अशी अज्ञात व्यक्तीने धमकी दिल्याची मिलिंद तक्रार नार्वेकर यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे.

संजय पाटील यांचेही असेच वक्तव्य

एकदा बोलता बोलता सांगलीचे भाजप खासदार संजय पाटील यांनीही एक खळबळजनक वक्तव्य केले होते. माझ्यामागे ईडी लागणार नाही कारण मी भाजपचा आहे, असे संजय पाटील म्हणताना दिसून आले होते. तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनीही असेच वक्तव्य केले होते.

माजलात का तुम्ही, बबनराव लोणीकरांचा तोल गेला; अभियंत्याला शिवीगाळ? ऑडिओ क्लिप व्हायरल

BJP Attack on Kejriwal: दिल्लीत केजरीवालांच्या घरावर नेमका हल्ला कसा झाला? CCTV फुटेजनं भाजप युवा मोर्चाला उघडलं पाडलं, पाहा व्हिडीओ

Nana Patole : नाना पटोलेंनी मुख्यमंत्र्यांना करून दिली किमान समान कार्यक्रमाची आठवण, पत्रात नेमकं काय?

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.