Ajit Pawar | मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट्स; Satish Uke प्रकरणी अजित पवारांची सावध प्रतिक्रिया

Ajit Pawar | मला काहीच सांगायचं नाही, नो कमेंट्स; Satish Uke प्रकरणी अजित पवारांची सावध प्रतिक्रिया
वकील सतीश उके यांच्यावरील कारवाईवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.
Image Credit source: tv 9

नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्यावरील प्रश्नावर अजित पवार यांनी नो कमेंट म्हटलंय. सतीश उकेंवरील कारवाईवर प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी टाळलं. जमीन गैरव्यवहार प्रकरणी वकील सतीश उके यांना अटक करण्यात आली. बनावट दस्तावेज तयार करून जमीन बळकावल्याचा सतीश उके यांच्यावर आरोप आहे.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 31, 2022 | 12:11 PM

नागपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, अलीकडच्या काळात विकासाचे मुद्दे सोडून बाकीच्यात मुद्द्यावर आपण चर्चा करतो. नाना पटोलेंचे वकील सतीश उके यांच्यावरील प्रश्नावर अजित पवार यांनी नो कमेंट म्हटलंय. सतीश उकेंवरील कारवाईवर प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी टाळलं. जमीन गैरव्यवहार प्रकरणी वकील सतीश उके यांना अटक करण्यात आली. बनावट दस्तावेज तयार करून जमीन बळकावल्याचा सतीश उके यांच्यावर आरोप आहे. सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडी कार्यालयात आणलं. उके बंधू सीजीओ कॅाम्प्लेक्स (CGO Complex) परिसरातील ईडी कार्यालयात आहेत. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून उके बंधूची चौकशी सुरू आहे. प्रॅापर्टी खरेदीबाबत (Property Purchase) ईडी उके बंधूंची चौकशी करत असल्याची सुत्रांची माहिती आहे.

प्रतिक्रिया देणं अजित पवारांनी टाळलं

प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. त्यानंतर ईडीनं सतीश उके (Satish Uke) यांना ताब्यात घेतलं. सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडीच्या ताब्यात घेण्यात आलंय. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे. असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय. याबद्दल प्रतिक्रिया देणं अजित पवार यांनी टाळलं.

चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधातही प्रेस

लोहिया प्रकरण तसेच निमगडे हत्याकांड प्रकरणी उके हे वकील आहेत. आज सकाळी साडेपाच वाजता उके कुटुंबीय झोपेत होते. ईडीचे अधिकारी मुंबईवरून आले. त्यांनी मोबाईल, लॅपटॉप जप्त केले. सतीश उके आणि प्रदीप उके यांच्या रूम तपासल्या. तिथून काही कागदपत्र जप्त केले. त्यानंतर चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात घेऊन गेले. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भरपूर केसेस लढल्या आहेत. शिवाय चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधातील पत्रकार परिषदही सतीश उके यांनी घेतली होती.

Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत

Satish Uke ED Raid : फडणवीसांचा विरोध, पटोलेंशी जवळीक, राऊतांची भेट, सतीश उकेंना नेमकं काय काय भोवलं?

Who is Satish Uke: कोण आहेत नागपुरचे सतीश उके ज्यांच्यावर ED ने धाड टाकलीय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें