Satish Uke ED Raid : फडणवीसांचा विरोध, पटोलेंशी जवळीक, राऊतांची भेट, सतीश उकेंना नेमकं काय काय भोवलं?

सतीश उके हे काँग्रेसच्या तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या जवळीक आहेत. नाना पटोले यांना गावगुंड मोदींना मारण्याची भाषा केली होती. त्यावेळी त्यांची बाजू ही उके यांनी उचलून धरली. गावगुंड मोदीला उके यांनी पत्रकार परिषदेत बोलायला लावले. नुकतेच संजय राऊत हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी उके यांनी संजय राऊतांची भेट घेतली. या सर्व प्रकरणांची दखल भाजपच्या नेत्यांनी घेतली. त्यांची तशी तक्रार केली. यावरून या धाडी पडल्याचं बोललं जातंय.

Satish Uke ED Raid : फडणवीसांचा विरोध, पटोलेंशी जवळीक, राऊतांची भेट, सतीश उकेंना नेमकं काय काय भोवलं?
सतीश उके यांच्या घरी आज सकाळी ईडीची धाड पडली. Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 31, 2022 | 9:52 AM

नागपूर : नागपुरातील सुप्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीने गुरुवारी सकाळी धाड टाकली. उकेंच्या घराबाहेर सीआरपीएफ जवानांचा बंदोबस्त आहे. ॲड. सतीश उके यांनी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या विरोधात निवडणूक याचिका दाखल केली होती. त्यावेळीही सतीश उके बरेच चर्चेत राहिले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या बाजूने फोन टॅपिंग प्रकरणात केस लढवत आहेत. एकंदरित उके हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात तसेच भाजपच्या विरोधात नेहमी पत्रकार परिषदांच्या माध्यमातून बोलत असतात. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधातही त्यांनी अनेक पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. उके हे काँग्रेसच्या तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या जवळीक आहेत. नाना पटोले यांना गावगुंड मोदींना मारण्याची भाषा केली होती. त्यावेळी त्यांची बाजू ही उके यांनी उचलून धरली. गावगुंड मोदीला उके यांनी पत्रकार परिषदेत बोलायला लावले. नुकतेच संजय राऊत (Sanjay Raut) हे विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी उके यांनी संजय राऊतांची भेट घेतली. या सर्व प्रकरणांची दखल भाजपच्या नेत्यांनी घेतली. त्यांची तशी तक्रार केली. यावरून या धाडी पडल्याचं बोललं जातंय.

नाना पटोलेंशी जवळीकता

नाना पटोले यांनी गावगुंड मोदींना मारण्यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. तेव्हा गावगुंड मोदी समोर आला. तो पत्रकार परिषद घेत होता. तेव्हा त्याच्यासोबत सतीश उके होते. नाना पटोलेंची बाजू सावरण्याचं काम सतीश उके करत होते. त्यामुळं काँग्रेसच्या जवळचा वकील अशी प्रतिमा सतीश उके यांनी आहे.

संजय राऊत यांच्याशी तीन वेळा भेट

वकील सतीश उके यांच्या घरावर अंमलबजावणी संचालनालयाने धाड टाकली. पार्वती नगर भागातील निवासस्थानी गुरुवारी पहाटे ईडी अधिकाऱ्यांनी छापा टाकला. नागपुरातील एका जमीन व्यवहाराच्या संदर्भात उकेंना क्राईम ब्रांचने नोटीस बजावली होती. या प्रकरणाशी संबंधित ही छापेमारी असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतीश उके यांनी नुकतीच शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली होती. संजय राऊत यांच्याशी नागपुरात तीन वेळा त्यांची भेट झाली होती.

देवेंद्र फडणवीसांविरोधात याचिका

देवेंद्र फडणवीस यांच्यावर 2014 मधील विधानसभा निवडणुकीवेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात दोन फौजदारी खटल्यांची माहिती लपवल्याचा आरोप झाला. या दोन फौजदारी गुन्ह्यांमध्ये एक अब्रुनुकसानीचा, तर दुसरा फसवणुकीचा खटला होता. फडणवीसांनी खोटं प्रतिज्ञापत्र सादर केल्याचा आरोप वकील सतीश उके यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेत केला होता. फडणवीस यांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. त्यामुळे त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली होती.

देवेंद्र फडणवीसांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा, खोट्या प्रतिज्ञापत्र प्रकरणी खुल्या कोर्टात सुनावणी

सतीश उके, प्रदीप उके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा, प्रकरण काय? एकेकाळी मांडली फडणवीसांविरोधात बाजू

Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.