Video Satish Uke ED Raid : नाना पटोलेंचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात; लॅपटॉप, मोबाईल केले जप्त

Video Satish Uke ED Raid : नाना पटोलेंचे वकील सतीश उके ईडीच्या ताब्यात; लॅपटॉप, मोबाईल केले जप्त
वकील सतीश उके यांना ईडी कोठडी
Image Credit source: tv 9

ईडीचे अधिकारी मुंबईचे (ED officer from Mumbai) आहेत म्हणून मोठी पोलीस फोर्स घेऊन आले. तेव्हा आम्ही झोपेत होतो. आमचे सर्वांचे मोबाईल जमा केले. तुम्ही फक्त लॅट्रीन, बाथरूमला जाऊ शकता. फक्त मुलांना शाळेत जाऊ देण्याची मुबा होती, असं उके यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Mar 31, 2022 | 11:22 AM

नागपूर : प्रसिद्ध वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीनं सतीश उके (Satish Uke) यांना ताब्यात घेतलं. सकाळपासून पाच तास चौकशी करण्यात आली. सतीश उके आणि प्रदीप उके यांना ईडीच्या ताब्यात घेण्यात आलंय. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे. असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय. लोहिया प्रकरण तसेच निमगडे हत्याकांड प्रकरणी उके हे वकील आहेत. उके यांचे कुटुंबीय म्हणले, आज सकाळी साडेपाच वाजता आम्ही झोपेत होतो. ईडीचे अधिकारी मुंबईचे (ED officer from Mumbai) आहेत म्हणून मोठी पोलीस फोर्स घेऊन आले. तेव्हा आम्ही झोपेत होतो. आमचे सर्वांचे मोबाईल जमा केले. तुम्ही फक्त लॅट्रीन, बाथरूमला जाऊ शकता. फक्त मुलांना शाळेत जाऊ देण्याची मुबा होती.

मोबाईल, लॅपटॉप जप्त

सतीश उके आणि प्रदीप उके यांच्या रूम चेक करायच्या आहेत, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिथून काही कागदपत्र जप्त करायचे आहेत. आम्ही कारवाईसाठी आलोत. आम्ही कारवाई करत आहोत, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. उके यांचे कुटुंबीय म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भरपूर केसेस केलेल्या आहेत. त्या चालू आहेत. एका प्रकरणाचा निकाल दोन-चार दिवसांत लागणार आहे. त्यासाठी त्यांनी तसेच पुढे भविष्यात आणखी काय करणार आहे. त्यासंबंधी सती उके यांचा लॅपटॉप मोबाईल जप्त करण्यात आला.

पाहा व्हिडीओ

महिनाभरापासून सुरू होती रेकी

ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही कागदपत्र जप्त केले. महिला अधिकारी लिफाफ्यात काहीतरी भरताना दिसत होत्या. उके यांचे नातेवाईक म्हणाले, महिनाभरापासून घराजवळ रेकी चालू होती. सर्व अधिकारी माहिती गोळा करत होते. घरचे छोट्यापासून मोठे काय करतात, याची सर्व माहिती गोळा केली. लॅपटॉपमध्ये असलेलं हस्तगत करायचं होतं. ज्यामुळे झालेल्या केसेस आणि भविष्यात होणाऱ्या केसेसची माहिती घेतली जाईल. लोहिया केस, निमगडे हत्याकांड, निवडणूक पिटीशनमध्ये काही गुन्हे लपविले. तुम्हाला काय पाहिजे, याबद्दल विचारणा झाली. पण, आम्ही पैशासाठी काम करत नाही. ऑफिसला घेऊन जातो. विचारपूस करून सोडून देतो, असं सांगून ईडीचे अधिकारी सतीश उके यांना घेऊन गेले. ते चौकशी करून सोडून देतात की, अटक करतात, हे लवकरच समजेल.

Satish Uke ED Raid | नागपुरातील वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीची धाड, फडणवीसांविरोधातील याचिकेमुळे चर्चेत

Satish Uke ED Raid : फडणवीसांचा विरोध, पटोलेंशी जवळीक, राऊतांची भेट, सतीश उकेंना नेमकं काय काय भोवलं?

Who is Satish Uke: कोण आहेत नागपुरचे सतीश उके ज्यांच्यावर ED ने धाड टाकलीय

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें