ED Raid : ईडीचं धाडसत्र सुरुच; सतीश उकेंच्या घरावरील धाड आणि कारवाईनंतर पटोलेंचा मोंदीवर निशाणा

ED Raid : ईडीचं धाडसत्र सुरुच; सतीश उकेंच्या घरावरील धाड आणि कारवाईनंतर पटोलेंचा मोंदीवर निशाणा
नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस
Image Credit source: TV9

सतीश उके यांच्यावरील ईडीने टाकलेल्या धाडीनंतर नाना पटोले यांनी एक ट्वीट केलं आहे. 'आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू', अशा शब्दात नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

सागर जोशी

|

Mar 31, 2022 | 11:57 AM

मुंबई : राज्यात ईडीचं धाडसत्र सुरुच आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांचे वकील सतीश उके यांच्या घरावर ईडीनं पहाटे धाड (ED Raid) टाकली. जवळपास पाच तास चाललेल्या या धाडसत्रानंतर आता सतीश उके यांना ईडीने ताब्यात घेतलंय. ईडीच्या या धाडीनंतर नाना पटोले (Nana Patole) यांनी भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर (Central Investigation Agency) जोरदार हल्ला चढवलाय. सतीश उके यांच्यावरील ईडीने टाकलेल्या धाडीनंतर नाना पटोले यांनी एक ट्वीट केलं आहे. ‘आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’, अशा शब्दात नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय.

‘मोदींच्या राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी धोरणांविरुद्ध आवाज उठविणाऱ्याचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न मोदी सरकार करेल, असा संदेश दिला जात आहे. पण आम्ही देश वाचविण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहू’, असं ट्वीट करत पटोले यांनी केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केलीय.

पटोलेंचा भाजपवर निशाणा

सतीश उके ईडीच्या ताब्यात

वकील सतीश उके यांच्या घरी गुरुवारी सकाळीच ईडीनं धाड टाकली. सकाळपासून चौकशी सुरू होती. त्यानंतर आता ईडीनं उके यांना ताब्यात घेतलं. सकाळपासून पाच तास चौकशी करण्यात आली. सतीश उके आणि त्यांचे भाऊ प्रदीप उके यांना ईडीच्या ताब्यात घेण्यात आलंय. सतीश उके हे नाना पटोले यांचे वकील आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यानुसार ही सर्व कारवाई होत आहे, असा आरोप उके यांच्या कुटुंबीयांनी केलाय.

मोबाईल, लॅपटॉप जप्त

सतीश उके आणि प्रदीप उके यांच्या रूम चेक करायच्या आहेत, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. तिथून काही कागदपत्र जप्त करायचे आहेत. आम्ही कारवाईसाठी आलोत. आम्ही कारवाई करत आहोत, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं. उके यांचे कुटुंबीय म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात भरपूर केसेस केलेल्या आहेत. त्या चालू आहेत. एका प्रकरणाचा निकाल दोन-चार दिवसांत लागणार आहे. त्यासाठी त्यांनी तसेच पुढे भविष्यात आणखी काय करणार आहे. त्यासंबंधी सती उके यांचा लॅपटॉप मोबाईल जप्त करण्यात आला.

इतर बातम्या :

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें