VIDEO: साताऱ्यातील विदारक परिस्थिती; बेड नसल्यामुळे महिलेवर रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्याची वेळ

| Updated on: Apr 14, 2021 | 11:22 AM

वडुज येथील ग्रामीण रुग्णालयाबाहेर एका महिलेवर रिक्षातच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. | Coronavirus situation worsened in Satara

VIDEO: साताऱ्यातील विदारक परिस्थिती; बेड नसल्यामुळे महिलेवर रिक्षामध्ये ऑक्सिजन लावण्याची वेळ
Follow us on

सातारा: मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता साताऱ्यातही कोरोना रुग्णांच्या (Coronavirus) वेगाने वाढणाऱ्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. साताऱ्यातील अनेक रुग्णालयांमध्ये उपचार करण्यासाठी बेडसच शिल्लक नसल्याने रुग्णांना बाहेर ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे एका महिलेवर चक्क रिक्षात बसून ऑक्सिजन लावण्याची वेळ ओढावली. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (Coronavirus situation worsened in Satara Maharashtra)

गेल्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्याप्रमाणावर वाढली आहे. साताऱ्यातील कोव्हीड सेंटर बंद असल्याने रुग्णांच्या हालअपेष्टांमध्ये आणखीनच भर पडली आहे. त्यामुळे मंगळवारी वडुज येथील ग्रामीण रुग्णालयाबाहेर एका महिलेवर रिक्षातच ऑक्सिजन लावण्याची वेळ आली. यानंतर सिव्हिल सर्जन यांच्या फोन नंतर संबधित महिलेला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, ही एकूण परिस्थिती पाहता साताऱ्यातील अवस्था सध्या बिकट असल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या; फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

मुंबई आणि पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, या दोन शहरांपलीकडेही महाराष्ट्र आहे, हे सरकारच्या लक्षातच आलेले नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. सरकारच्या या धोरणामुळेच नागपूर, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये आरोग्य व्यवस्था अजूनही वाढवलेल्या नाहीत. त्यामुळे आता मी नागपूरमध्येच थांबून या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

याशिवाय, ऑक्सिजनची कमतरता हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्य सरकारला ऑक्सिजनच्या वाहतुकीचे व्यवस्थापन जमत नाही. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

पुणे-पिंपरीत विदारक चित्र, YCM मध्ये रुग्णांना झोपावयाला जमीनही पुरेना

पिंपरी चिंचवड शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांचा आकडा प्रचंड प्रमाणात वाढत आहे. हा आकडा थोपवण्यासाठी आणि कमी करण्यासाठी प्रशासन प्रचंड प्रयत्नही करतंय. मात्र, आता प्रशासनही हतबल होताना दिसतंय. दररोज शेकडो कोरोनाबाधित आढळत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण प्रचंड वाढत आहे.

त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील विदारक स्थिती आता समोर आली आहे. ही स्थिती बघून आपल्याही डोळ्यांमध्ये पाणी येईल. महापालिकेच्या रुग्णालयात आता रुग्णांना चक्क जमीनीवर झोपवून ऑक्सिजन दिला जात असल्यााचा प्रकार नुकताच समोर आला होता.

संबंधित बातम्या:

परप्रांतीय कामगारांची गावी जाण्यासाठी धडपड; महाराष्ट्रातून बिहारला गेलेल्या ट्रेन्समध्ये 38 कोरोना पॉझिटिव्ह

Maharashtra Corona Update : राज्यात कोरोनाचा उद्रेक, दिवसभरातील रुग्णांचा आकडा 60 हजार पार, 281 जणांचा मृत्यू

कोरोनाबाधितांवर उपचार करणारा डॉक्टर फक्त बारावी पास, पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर

(Coronavirus situation worsened in Satara Maharashtra)