बापरे! सोलापुरात 31 ते 50 वयोगटातील लोकांना कोरोनाची सर्वाधिक लागण; वाचा, काय आहे आकडा

| Updated on: Mar 27, 2021 | 1:00 PM

राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सोलापुरातही कोरोना संसर्गाने कहर केला आहे. (Covid-19 cases in Solapur raises Maharashtra government concern)

बापरे! सोलापुरात 31 ते 50 वयोगटातील लोकांना कोरोनाची सर्वाधिक लागण; वाचा, काय आहे आकडा
प्रातिनिधिक छायाचित्रं
Follow us on

सोलापूर: राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. सोलापुरातही कोरोना संसर्गाने कहर केला आहे. सोलापुरात 31 ते 50 वयोगटातील लोकांना सर्वाधिक कोरोनाची लागण होत असल्याचं आढळून आलं आहे. या वयोगटातील लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत असल्याने त्यांना कोरोनाची लागण होत असून त्यामुळे सोलापूरच्या आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. (Covid-19 cases in Solapur raises Maharashtra government concern)

सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा महाविद्यालये बंद असल्याने लहान मुले बाहेर पडत नसल्याने त्यांना संसर्ग होण्याचा धोका कमी झाला आहे, शिवाय ज्येष्ठ नागरिक कामाशिवाय सुद्धा घराबाहेर पडत नाहीत, त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होण्याच प्रमाण कमी झाल आहे. मात्र असं असताना घरगाडा चालवण्यासाठी किंवा कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या 31 ते 50 वयोगटातील लोक कोरोना संसर्गित होत असल्याचं चित्र आता समोर येत आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तसेच 31 ते 50 वयोगटातील लोकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, घराबाहेर पडल्यानंतर मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे या नियमांचे काटेकोरपालन करावे, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे. शहरातील एकूण 14 हजार 487 रुग्णांपैकी 5105 रुग्ण आहे या वयोगटातील असल्याचं समोर आला आहे.

ज्येष्ठ नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण अधिक

सोलापुरात 31 ते 50 वयोगटातील लोकांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढल्याने कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या लोकांनी आता काळजी घेणे आवश्यक बनले आहे. वृद्धांमध्ये कोरोना संसर्गाचा प्रमाण कमी असले तरी वृद्धांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. शहरात आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये 692 जेष्ठ नागरिक असून ते 51 ते 60 वयोगटातील असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आकडेवारी

सोलापुरात आतापर्यंत 15 वर्षाखालील कोरोना रुग्णांची संख्या 1019 जण झाली आहे.

16 ते 30 वयोगटातील कोरोना रुग्णांची संख्या 3027 झाली आहे.

31 ते 50 वयोगटातील रुग्णांची संख्या 5105 एवढी आहे.

60 वर्षावरील कोरोन रुग्णांची संख्या 2762 एवढी झाली आहे.

पुण्यात काय?

कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक उपाययोजना आणि स्थानिक पातळीवर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. तरीही कोरोनाचा विळखा वाढताना पाहायला मिळत आहे. त्यात पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. पुणे शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूच्या प्रमाणातही मोठी वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. अशा स्थितीत पुणे शहर आणि जिल्ह्याची लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल सुरु असल्याचंच पाहायला मिळत आहे.

राज्यात कहर

राज्यात कोरोनाने हाहा:कार उडवला असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढतच आहे. राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनाकडून कडक निर्बंध लागू करण्यात आले असले तरी, कोरोना संसर्ग (Maharashtra Corona) आटोक्यात आणणे शक्य होत नाहीये. या पार्श्वभूमीवर काल 26 मार्चला सुद्धा कोरोना रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. काल दिवसभरात कोरोनाचे तब्बल 36,902 नवे रुग्ण आढळले आहेत. मृतांचा आकडासुद्धा शंभरी पार गेला असून काल दिवसभरात कोरोनामुळे 112 जणांचा मृत्यू झाला आहे. (Covid-19 cases in Solapur raises Maharashtra government concern)

 

संबंधित बातम्या:

पुण्यात 2 एप्रिलपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर….,अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा

खासगी रुग्णालयांनी कोरोना त्वरित बेड द्यावेत, अन्यथा…. पुण्याच्या महापौरांचा निर्वाणीचा इशारा

Pune Corona Update : पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ! लॉकडाऊन होणार?

(Covid-19 cases in Solapur raises Maharashtra government concern)