पुण्यात 2 एप्रिलपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर….,अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा

पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. (Ajit Pawar Pune Corona Lockdown Update)

पुण्यात 2 एप्रिलपर्यंत अशीच परिस्थिती राहिली तर....,अजित पवारांचा निर्वाणीचा इशारा
अजित पवार
Follow us
| Updated on: Mar 26, 2021 | 12:57 PM

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत पुण्यातील वाढता कोरोना याबद्दलची चर्चा करण्यात आली. पुण्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे. पण ही परिस्थिती अशीच राहिली तर येत्या 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. (Ajit Pawar Pune Corona Lockdown Update)

पुण्यात 2 एप्रिलपर्यंत निर्णय घ्यावा लागेल

“मी सर्वांशी चर्चा केली आहे. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. जर ही परिस्थिती अशीच राहिली तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल. जनतेच्या मनात भीती राहिली नाही. मी याबद्दल केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी बोललो आहे. सगळे निर्णय एकमताने घेतले आहेत. पुण्यात लसीकरणाचा वेग वाढवणार आहे.पुण्यात 50 टक्के बेड्स राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खाजगी कार्यक्रम सर्वच पक्षांनी बंद केले पाहिजेत. लग्न किंवा अंत्यसंस्कारावेळी 50 पेक्षा जास्त संख्या नको,” अशी सूचना अजित पवारांनी केली आहे.

सध्या लॉकडाऊन नाही, पण कडक निर्बंध लागू

पुण्यात सध्या तरी लॉकडाऊनचा निर्णय घेतलेला नाही. पण कडक निर्बंध लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच पुण्यात रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. या नियमांचे पालन केले नाही तर 2 एप्रिलला निर्णय घ्यावा लागेल, असेही अजित पवार म्हणाले.

जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार

यानुसार पुण्यातील शाळा-कॉलेज हे 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहे. याआधी 31 मार्चपर्यंत शाळा कॉलेज बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच पुण्यातील उद्यान केवळ सकाळी उघडी राहणार आहेत. त्याशिवाय  मॉल आणि थिएटर 50 टक्के संख्येने सुरु राहणार आहे. पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमध्ये टप्प्याटप्प्याने सुविधा वाढवणार आहे. तसेच पिंपरीचे जम्बो हॉस्पिटल 1 एप्रिलपासून सुरु करणार आहोत. पुण्यातील ससून रुग्णालयातील 500 बेड्सची व्यवस्था करणार आहे, असेही अजित पवारांनी सांगितले.

पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल

येत्या शुक्रवारी लॉकडाऊन संदर्भात नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागेल. पुढच्या आठवड्यापासून पुण्यात लॉकडाऊनचा निर्णय घ्यावा लागेल, असे संकेत अजित पवारांनी दिले. तसेच हॉटेल 50 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तसेच एपीएमसीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेत होणार आहे. त्याशिवाय दहावी आणि बारावीच्या परीक्षा ठरलेल्या वेळेतच होतील. नागरिकांना धान्य किराणा भरून ठेवण्यासाठी वेळ देण्याची गरज आहे, असे अजित पवारांनी सांगितले.

पुण्यातील गेल्या 4 दिवसातील रुग्णवाढ –

  • 21 मार्च – 2 हजार 900 नवे रुग्ण, 28 रुग्णांचा मृत्यू, 8 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 22 मार्च – 2 हजार 342 नवे रुग्ण, 17 रुग्णांचा मृत्यू, 2 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 23 मार्च – 3 हजार 98 नवे रुग्ण, 31 रुग्णांचा मृत्यू, 9 रूग्ण पुण्याबाहेरील.
  • 24 मार्च – 3 हजार 509 नवे रुग्ण, 33 रुग्णांचा मृत्यू, 9 रुग्ण पुण्याबाहेरील.

लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल

पुण्यात गेल्या काही दिवसांतील कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर ती अतिशय चिंताजनक आहे. त्यामुळे पुण्याची वाटचाल लॉकडाऊनच्या दिशेनं होत असल्याचं बोललं जात आहे. पण महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पुण्याची स्थिती काहीशी चिंताजनक बनली असली तर लॉकडाऊन करण्यासारखी परिस्थिती नसल्याचा दावा केला आहे. पण प्रशासन मात्र लॉकडाऊनच्या मनस्थितीत असल्याचं पाहायला मिळतंय. (Ajit Pawar Pune Corona Lockdown Update)

संबंधित बातम्या :

खासगी रुग्णालयांनी कोरोना त्वरित बेड द्यावेत, अन्यथा…. पुण्याच्या महापौरांचा निर्वाणीचा इशारा

Pune Corona Update : पुणेकरांची चिंता वाढली, कोरोना रुग्णसंख्या आणि मृत्यूच्या प्रमाणात मोठी वाढ! लॉकडाऊन होणार?

Non Stop LIVE Update
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.