त्यांचा आवाका कितपत, हे आम्हाला माहितीये; मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या नेत्यावर अजितदादांचा निशाणा

ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. | Ajit Pawar

त्यांचा आवाका कितपत, हे आम्हाला माहितीये; मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या नेत्यावर अजितदादांचा निशाणा
अजित पवार, उपमुख्यमंत्री
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 11:08 AM

पुणे: मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारविरोधात एल्गार पुकारणारे माथाडी समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कडाडून टीका केली आहे. काहीजण भावनेच्या आहारी जाऊन बोलतात. कायदा आणि संविधान बघत नाहीत. ही लोकं काही काळ आमच्यासोबत होती. त्यामुळे या नेत्यांचा आवाका किती आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो, असे अजित पवार यांनी म्हटले. (DCM Ajit Pawar take a dig at BJP leader Chandrakant Patil and Narendra Patil)

ते रविवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार प्रयत्न करत असल्याचे सांगितले. कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. आम्ही राज्यपालांना भेटलो आहोत, आता वरिष्ठांनाही भेटणार आहोत. कोर्टाने जे ग्राह्य धरलंय त्यानुसार साकल्याने विचार करू. माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले, आणि सदस्य यांचे मत घेतोय. लवकरच आम्ही यावर तोडगा काढू, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

मराठा आरक्षणासंदर्भात विरोधकांची भूमिका दुटप्पी

मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले असते तर विरोधकांनी त्याचे श्रेय घेतले असते. आम्हीच मराठा आरक्षणाचा कायदा केला होता. आम्हीच असं केलं होतं, असे भाजपचे नेते म्हणाले असते. भाजप नेत्यांच्या याच वृत्तीचा मला राग येतो, असे अजित पवार यांनी म्हटले.
राज्य सरकारला सर्व जातीधर्मांना सोबत घेऊन राज्यकारभार करावा लागतो. त्यामुळे सारथी संस्थेसंदर्भात योग्य वेळ आल्यावर निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार यांनी सांगितले.

‘चंद्रकांतदादांना काम नसल्यामुळे जुन्या गोष्टी उकरुन काढतायत’

मी भाजपसोबत सत्ता स्थापन केल्याच्या घटनेला आता 14 महिने उलटले आहेत. तरीही चंद्रकांत पाटील जुन्या गोष्टी उकरुन काढत आहेत. ज्यांना काम नाही ते लोक नको त्या गोष्टी बोलतात. सध्याच्या घडीला कोरोना परिस्थितीकडे लक्ष देणे अधिक गरजेचे असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी: विनापरवानगी मोर्चा काढल्याबद्दल विनायक मेटे आणि नरेंद्र पाटलांवर गुन्हा दाखल

Maratha Morcha : कितीही हजारांचा पोलीस बंदोबस्त असू दे, मराठा मोर्चा निघणारच; विनायक मेटेंचा निर्धार

बीडमधील मराठा मोर्चाला प्रशासनाची परवानगी नाही; मोर्चा निघणारच, विनायक मेटे ठाम

(DCM Ajit Pawar take a dig at BJP leader Chandrakant Patil and Narendra Patil)