प्रदीप कापसे, टीव्ही 9 मराठी, बीड : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमी शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाची घोषणा केली आहे. त्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यात विविध संघटनांच्या बैठकाही घेतल्या आहेत. भाजपनेही विनायक मेटे यांच्या नेृतृत्वातील मोर्चाला पाठिंबा दिला आहे. अशावेळी प्रशासनाकडून मात्र या मोर्चाला परवानगी नसल्याचं कळतंय. असं असलं तर मराठा मोर्चा निघणारच अशी ठाम भूमिका विनायक मेटे यांनी घेतली आहे. (Maratha Morcha in Beed is not allowed by the administration)