उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नसून भाजपचा; काँग्रेसचा आरोप

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यावरून काँग्रेसने मेटेंवर टीका केली आहे. (congress opposed vinayak mete's tomorrow maratha morcha)

उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नसून भाजपचा; काँग्रेसचा आरोप
विनायक मेटे, अध्यक्ष, शिवसंग्राम संघटना

प्रदीप कापसे, टीव्ही9 मराठी, बीड: शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी उद्या शनिवारी बीडमध्ये मराठा समाजाच्या मोर्चाचे आयोजन केलं आहे. त्यावरून काँग्रेसने मेटेंवर टीका केली आहे. उद्याचा बीडचा मोर्चा हा मराठा समाजाचा नसून भाजपचा आहे. मराठा समाजाचा मोर्चा असता तर आम्हीही त्यात सहभागी झालो असतो, असं काँग्रेसने म्हटलं आहे. (congress opposed vinayak mete’s tomorrow maratha morcha)

काँग्रेसचे प्रवक्ते संजय लाखे यांनी ही टीका केली आहे. उद्याचा बीडचा मोर्चा मराठा समाजाचा नाही. मराठा समाजाचा या मोर्चाशी काहीही संबंध नाही. हा मोर्चा निव्वळ भाजपचा आहे. विनायक मेटे आणि नरेंद्र पाटील हे भाजपच्या प्रचार समितीचे सदस्य आहेत. त्यामुळे मोर्चा कुणाचा आहे हे स्पष्ट होते, असं सांगतानाच विनायक मेटे खोटं बोलण्याचं काम करत आहेत, अशी टीका लाखे यांनी केली.

भाजपकडून मराठ्यांची फसवणूक

उद्याचा मोर्चा राजकीय पक्षाचा नसल्याचं मेटे सांगत आहे. कारण मेटेंना मी एकटाच शहाणा आहे असं वाटत आहे. पण समाज मूर्ख नाही. नरेंद्र पाटील आणि मेटे भाजपच्या प्रचार समितीचे सदस्य नसते तर आम्हीही त्यांच्यासोबत मैदानात उतरलो असतो, असंही ते म्हणाले. भाजप पुरस्कृत उद्याच्या मोर्चाला आमचा विरोध आहे, असं सांगतानाच भाजपने मराठा आरक्षणासंदर्बात न्यायालय आणि समाजाची फसवणूक केली आहे, असा दावाही त्यांनी केला.

उद्या मोर्चा

दरम्यान, विनायक मेटे यांनी उद्या 5 जून रोजी बीडमध्ये मराठा मोर्चाचे आयोजन केलं आहे. मराठा आरक्षण कायदा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजात प्रचंड प्रमाणात रोष आहे. 5 जून रोजी बीड येथे मराठा समाजाच्या वतीने संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा मराठा क्रांती मोर्चांच्या प्रथेप्रमाणे शांततेत व शिस्तीत, कायदा व सुव्यवस्थेला कुठलीही बाधा येऊ न देता काढला जाईल. त्याचप्रमाणे करोना महामारीच्या काळातील आरोग्यविषयक सर्व नियमांचे पालन करून, सोशल डिस्टनसिंग पाळून हा मोर्चा काढला जाईल याची खात्री असावी, असं मेटे यांनी म्हटलं आहे. (congress opposed vinayak mete’s tomorrow maratha morcha)

संबंधित बातम्या:

संभाजी छत्रपती आणि भाजपात मतभेद वाढतायत? पाटील म्हणतात, पक्षाने किती सन्मान दिला हे संभाजीराजे सांगत नाहीयेत!

Maratha Reservation: शरद पवार आणि संभाजीराजेंची अवघ्या 10 मिनिटांची चर्चा सकारात्मक कशी, विनायक मेटेंचा सवाल

Maharashtra News LIVE Update | यावर्षी पायी वारी झालीच पाहिजे, भाजपची आध्यात्मिक आघाडी आक्रमक

(congress opposed vinayak mete’s tomorrow maratha morcha)

Published On - 12:52 pm, Fri, 4 June 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI