
“आजचादिवस पुना गुजराती समाजासाठी ऐतिहासिक दिवस आहे. इथे कुठस्या गोष्टीची कमतरता नाहीय. कारण तुम्ही सर्व लक्ष्मीपुत्र आहात. त्यामुळे काही कमी पडण्याचा प्रश्नच येत नाही. मोदीजी ज्या कार्याचं भूमिपूजन करतात ती काम वेगवान गतीने पूर्ण होतात. मी आपला अनुभव सांगतोय, समृद्धी हायवे असो, कोस्टल रोड असो अशी अनेक उदाहरण आहेत. त्यांचं भूमिपूजन आणि उद्घाटन दोन्ही मोदीजींनी केलं. या वास्तूच भूमिपूजन मोदीजींनी केलं. पण लोकार्पण अमित भाईंच्या हस्ते होतय” असं एकनाथ शिंदे म्हणाले. ते कोंढवा बुद्रुक येथे जयराज स्पोर्ट्स आणि कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमात अमित शाह यांचं भरभरुन कौतुक केलं.
“नरेंद्र मोदी आणि अमित शाह आमच्यासाठी वेगळे नाहीत. मोदीजींची सावली म्हणजे अमितभाई आहेत. अमित शाहांचा स्पर्श झाल्यानंतर त्या कार्याचं सोनं होतं. तुम्ही सर्व लक्ष्मीपुत्र आहात. आंनंद दिघे साहेबांचे शब्द मला आठवतात. कुठलही शहर असो, गहसंकृल असो, त्या शहराला बाजारपेठ नसेल तर शोभा वाढत नाही. व्यवसाय, बाजारपेठ बनवणारे तुम्ही लोक आहात. तुम्ही व्यपारी आहात. तुमच्याशिवाय कुठल्या शहराची शोभा वाढत नाही” अशा शब्दात एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं.
‘अमित भाई आव्हानाला ते संधी समजतात’
“या सेंटरचा भविष्यात अजून विस्तार होईल. अमित भाई राष्ट्रहिताल पहिलं प्राधान्य देतात. आव्हानाला ते संधी समजतात. त्यांच्या कार्यशैलीत दृढता, संकल्प आहे. नव्या भारताच्या निर्माणात मोदींसोबत त्याचं योगदान महत्त्वाचं आहे. अमित भाई कुशल रणनितीकार आहेत. त्यांच्या रणनितीने नेतृत्वाने अशक्य ते शक्य करुन दाखवलं. काश्मीरमधील कलम 370 हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय असो. अमित शाहंनी राष्ट्रहिताला नेहमी वरती ठेवलं” असं कौतुक करताना एकनाथ शिंदे म्हणाले.
‘अमित शाह चट्टानासारखे माझ्यामागे उभे होते’
“भारताच्या प्रत्येक नागरिकासाठी त्यांचं उज्वल भविष्याच स्वप्न आहे. मला स्वत:ला अनुभव आहे. 2022 साली तुम्हाला माहित असेल, या राज्यात मंदिरं, बाजारपेठा सगळं बंद होतं. सगळे स्पीड ब्रेकर होते. त्यावेळी सर्वसामान्यांच सरकार आणण्याची गरज होती. मोदीजींच मार्गदर्शन होतच. पण अमित शाह चट्टानासारखे माझ्यामागे उभे होते. काम सोपं नव्हतं. राज्याच्या विकासाची विषय येतो, तेव्हा अशी पावल उचलावी लागतात” असं एकनाथ शिंदे म्हणाले.
‘त्यांच्या घरात मराठी आणि गुजराती दोन्ही भाषा आनंदाने नांदतात’
“आज मी, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एक टीम बनून काम करत आहोत. या राज्याला पुढे घेऊन जात आहोत. मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो. अशीच एकजूट मजबूत ठेवा. या राज्याच्या विकासात आपलही योगदान आहे. आपल्याला उद्योग, व्यवसायात कुठली अडचण येणार नाही असा विश्वास व्यक्त करतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी अमित शाहंसाठी त्यांनी एक खास शेर म्हटला. भाषण संपवताना एकनाथ शिंदे यांनी जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात म्हटलं.