Cycle competition : ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडणं आवश्यक, पुण्यातल्या सायकल स्पर्धेप्रसंगी दिलीप वळसे पाटलांचं प्रतिपादन

| Updated on: Jul 23, 2022 | 3:56 PM

रोहित पवार यांनी कोविड महामारीच्या काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता गेली सात वर्षे सातत्याने या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. तसेच युवा वर्गाला आपले नैपुण्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे, असे नमूद केले.

Cycle competition : ग्रामीण भागातून गुणवत्तापूर्ण खेळाडू घडणं आवश्यक, पुण्यातल्या सायकल स्पर्धेप्रसंगी दिलीप वळसे पाटलांचं प्रतिपादन
अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सायकल स्पर्धा
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवण्यासाठी विद्यार्थी केंद्रबिंदू मानून पुणे जिल्हा शिक्षण मंडळाने केलेले कार्य प्रेरणादायी आहे. विशेषतः अजित पवार (Ajit Pawar) यांच्या दूरदृष्टीने आणि कल्पक नेतृत्वाने पुणे जिल्हा शिक्षण मंडळ यशाच्या शिखरावर वाटचाल करत आहे. त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळाली. यामधून राज्याचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करणारे गुणवत्तापूर्ण खेळाडू घडतील, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केले. ते पुण्यात बोलत होते. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार वाडा येथे पुणे जिल्हा शिक्षण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय सायकल स्पर्धेच्या (Cycle competition) शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

गुणवत्ता वाढीसाठी उपक्रम

स्पर्धेचे प्रास्ताविक करत असताना पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदीप कदम यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेची संकल्पना आणि महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर या सायकल स्पर्धेची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण झाली आहे, असे नमूद विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी आयोजित विविध उपक्रमांची माहिती दिली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी पुणे ते बारामती राष्ट्रीय सायकल स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.

कौशल्य दाखवायची संधी

आपल्या मनोगतामध्ये विधानसभा सदस्य आ. रोहित पवार यांनी कोविड महामारीच्या काळातील दोन वर्षांचा अपवाद वगळता गेली सात वर्षे सातत्याने या स्पर्धेचे यशस्वीपणे आयोजन केल्याबद्दल मंडळाचे कौतुक केले. तसेच युवा वर्गाला आपले नैपुण्य दाखवण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळणे आवश्यक आहे, असे नमूद करत अशा प्रकारच्या स्पर्धांमधून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखवायची संधी मिळते, असे स्पष्ट केले. सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी या स्पर्धेमध्ये सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करत स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

हे सुद्धा वाचा

दुतर्फा थांबून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे केले स्वागत

मुख्य स्पर्धेचा शुभारंभ हडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे सकाळी 9.30 वाजता आयर्न मॅन आणि आंतरराष्ट्रीय सायकल पटू दशरथ जाधव, माजी मंत्री सुरेश घुले, आमदार चेतन तुपे, माजी महापौर सुनिल बनकर, राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा भारती शेवाळे, हडपसर विधानसभा मतदार संघ अध्यक्ष शंतनु जगदाळे, आमदार अॅड. अशोक पवार, आयर्न मॅन डॉ. योगेश सातव आदींच्या उपस्थितीमध्ये झाला. या सायकल स्पर्धेचे विद्यार्थ्यांनी दुतर्फा थांबून उत्स्फूर्तपणे स्वागत केले.

राजकीय, सामाजिक मान्यवरांची उपस्थिती

उद्घाटन समारंभाचे सूत्रसंचालन अमृता खराडे, नितीन लगड तर आभार प्रदर्शन अॅड. मोहनराव देशमुख यांनी केले. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव बाळासाहेब लांडगे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, अंकुश काकडे, माजी महापौर दीपक मानकर, सिने अभिनेते महेश कुलकर्णी, सिने अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड, अधिष्ठाता डॉ. विजय खरे, अधिष्ठाता डॉ. दिपक माने, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, बाबुराव चांदेरे, सुनिल चांदेरे, सुनिल जगताप, प्रदीप देशमुख, प्रकाश म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.

सायकल स्पर्धा – व्हिडिओ पाहा