
योगेश बोरसे, पुणे, दि.29 डिसेंबर | नवी दिल्लीत असलेल्या दाट धुक्याचा परिणाम पुणे आणि मुंबईतील विमानसेवेला बसला आहे. नवी दिल्ली आणि उत्तर भारतात जाणारी विमानांचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. सलग दुसऱ्या दिवशी पुणे ते दिल्ली विमान सेवा विस्कळीत झाली आहे. दिल्लीतील दाट धुक्यामुळे गुरूवारी पुणे ते दिल्ली दरम्यानची काही विमाने रद्द केली. त्यानंतर आता शुक्रवारी काही विमाने रद्द केली असून काही उड्डाणे उशिराने झाली आहे. तसेच काही विमानांचे मार्ग बदलले आहे. विमान सेवा विस्कळीत झाल्यामुळे सुट्टीचे नियोजन केलेल्या प्रवाशांना फटका बसला आहे.
मुंबईवरुन लखनऊसाठी जाणाऱ्या विमानांचे उड्डाण एक तास उशिराने झाले आहे. दिल्लीतील दाट धुक्याचा दिल्ली – पुणे विमानसेवेला फटका बसला आहे. या धुक्यामुळे पुणे ते दिल्ली चार विमाने शुक्रवारी रद्द करण्यात आली आहे. तसेच पुण्याहून एकूण 9 विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. दिल्ली – पुणे विमानांचे वेळापत्रक बिघडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. खराब हवामानामुळे मागील आठवड्यापासून सातत्याने विमान उड्डाणे रद्द होत आहेत. मागच्या आठवड्यात 12 विमान उड्डाणे रद्द करण्यात आली होती. तर शुक्रवारी 14 विमानांचे उड्डाणे रद्द झाली आहेत. नवी दिल्ली विमानतळावर इंडिगोची लखनऊ, मुंबई, बंगळूरू, भुवनेश्वर आणि भोपाळ येथील विमानांचे उड्डाण झाले नाही.
उत्तर भारत आणि नवी दिल्लीत डिसेंबर, जानेवारी महिन्यात धुके असते. त्याचा फटका रेल्वे सेवा आणि विमानसेवेला बसतो. धुक्क्यामुळे दरवर्षी अनेक विमानांचे उड्डाणे रद्द केली जातात. यामुळे आता CAT III Technology या तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर विचार सुरु झाला आहे. CAT III टेक्नोलॉजीच्या माध्यमातून विमानांचे उड्डाण केले जाते. ही एक नेव्हीगेशन प्रणाली आहे. त्यात 50 मीटर की व्हिजिबिलिटी असताना विमानांचे उड्डाण करण्याची परवानगी मिळते. या प्रणालीचा खर्च 10 कोटी रुपयांपर्यंत जातो. तसेच दर महिन्याला त्याचा देखभाल दुरुस्ती खर्च 50 लाख रुपयांपर्यंत जाते.