टोल नाक्यावर पत्रकारांना अडवल्यावर राज्यमंत्र्यांचे नाव सांगा, हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणेंना टोला

| Updated on: Aug 29, 2021 | 10:59 PM

यावेळी आपल्या भाषणात हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पत्रकारांचे काही प्रश्न व मागण्या आहेत. सध्या सरकारचे मंत्री इथे उपस्थित असल्यामुळे ते बघतील या प्रश्नांचं काय करायचं. सध्या आम्ही विश्रांती घेतोय. त्यामुळे काम त्यांनी(भरणे) बघावे. असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला.

टोल नाक्यावर पत्रकारांना अडवल्यावर राज्यमंत्र्यांचे नाव सांगा, हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणेंना टोला
टोल नाक्यावर पत्रकारांना अडवल्यावर राज्यमंत्र्यांचे नाव सांगा, हर्षवर्धन पाटलांचा दत्तात्रय भरणेंना टोला
Follow us on

इंदापूर : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे राजकीय कट्टर विरोधक एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिले होते. याला निमित्त होते ते मराठी पत्रकार परिषद संलग्न इंदापूर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित पत्रकार सन्मान सोहळ्याचे. इंदापूर तालुक्यातील जंक्शन पोलीस ठाण्याशेजारी हा कार्यक्रम घेण्यात आला होता. या सोहळ्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी दत्तात्रय भरणे यांचे नाव घेत त्यांना राजकीय चिमटे काढले. टोल नाक्यावर पत्रकारांना अडवल्यावर त्यांनी राज्यमंत्री भरणे यांचे नाव सांगावे, असा टोला हर्षवर्धन पाटलांनी दत्तात्रय भरणेंना लगावला. तर भरणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करीत राजकीय टीकाटिप्पणी न करता पत्रकारांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. (Ex minister Harshvardhan Patil target state minister Dattatray Bharane in Journalist Honor Ceremony)

काय म्हणाले हर्षवर्धन पाटील?

यावेळी आपल्या भाषणात हर्षवर्धन पाटील म्हणाले की, पत्रकारांचे काही प्रश्न व मागण्या आहेत. सध्या सरकारचे मंत्री इथे उपस्थित असल्यामुळे ते बघतील या प्रश्नांचं काय करायचं. सध्या आम्ही विश्रांती घेतोय. त्यामुळे काम त्यांनी(भरणे) बघावे. असे म्हणताच सभेत एकच हशा पिकला. तसेच शासन दरबारी जे काही प्रश्न असतील ते मंत्री म्हणून त्यांनी (भरणे) सोडवावेत जर त्यांना काही अडचण आली तर आम्ही दिल्लीतून प्रश्न सोडवू यामुळे पत्रकारांनी चिंता करू नये असे म्हणत भरणे यांना त्यांच्या उपस्थितीत पाटील यांनी चिमटा काढला.

पत्रकारांच्या काही मागण्या आहेत. यामध्ये पत्रकारांना टोलवर पास मिळावा, मात्र पत्रकारांनी त्यांचा फोटो, ओळखपत्र दाखवल्यानंतर त्यांना सोडण्यात येईल त्यांना कोणीच अडवणार नाही असे म्हणताच उपस्थित पत्रकारांनी आयकार्ड दाखवले तरी सोडत नाही असे म्हटले. तेव्हा पाटील यांनी मग आपल्या राज्यमंत्र्यांचे नाव सांगा, बांधकाम खाते त्यांच्याकडेच आहे त्यामुळे काहीच अडचण येणार नाही असे म्हणत भरणे यांना टोला लगावत विविध विषयांवर भाष्य केले.

कोणतीही राजकीय टिप्पणी न करता भरणेंकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कोणतीही राजकीय टीकाटिप्पणी न करता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खूप चांगले व साधे सरळ मुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत असे म्हणत मुख्यमंत्र्यांबद्दल गौरवोद्गार काढले. तसेच पत्रकार मंडळी खूप हुशार असल्याचे सांगत काही दिवसांपूर्वी सोलापूरमध्ये मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द काढलेल्या प्रसंगाचे उदाहरण देत पत्रकार कसे जेवढे पाहिजे तेवढेच कट करतात याचा दाखला भरणे यांनी दिला. यावेळी पत्रकार संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक राज्यमंत्री दत्तात्रय भरणे व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भरभरून केले. या कार्यक्रमात हे दोन कट्टर नेते एकाच व्यासपीठावर आल्याने इंदापूर तालुक्यात चर्चेचा विषय बनला होता. (Ex minister Harshvardhan Patil target state minister Dattatray Bharane in Journalist Honor Ceremony)

इतर बातम्या

आता शिवसेनेचा स्वबळाचा नारा, राऊत म्हणतात, मुंबईच नाही तर महाराष्ट्र जिंकता आला पाहिजे!

माझ्या फंदात पडू नकोस; नारायण राणेंचा संजय राऊतांना थेट इशारा