बारा वर्षांपासून पोट नसलेल्या प्रसिद्ध फूड ब्लॉगर नताशा डिड्डीचे पुण्यात निधन

Food Blogger Natasha Diddee death: नताशा डिड्डी हिच्या मृत्यूचे कारण अद्याप दिलेले नाही. परंतु नताशाने मागील काही मुलाखतींमध्ये आजाराचे संकेत दिले होते. तिने म्हटले होते की, अतिसार, मळमळ आणि जेवणानंतर चक्कर येणे किंवा थकवा यासारख्या विविध समस्यांनी तिला ग्रासले आहे.

बारा वर्षांपासून पोट नसलेल्या प्रसिद्ध फूड ब्लॉगर नताशा डिड्डीचे पुण्यात निधन
नताशा डिड्डी
| Updated on: Mar 27, 2024 | 8:12 AM

बारा वर्षापासून पोटविना जिवंत असणारी प्रसिद्ध फूड ब्लॉगर नताशा डिड्डी हिने जगाचा निरोप घेतला आहे. रविवारी (दि. २४) नताशाचे पुण्यात निधन झाले. तिच्या पतीने सोशल मीडियावर तिच्या निधनाची बातमी दिली. नताशाच्या मृत्यूचे कारण अद्याप दिलेले नाही. ‘द गटलेस फूडी’ या नावाने नताशा सोशल मीडियावर प्रसिद्ध होती. नताशाच्या ‘द गटलेस फूडी’ या अकाउंटवर एका लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स होते. ट्यूमर झाल्यानंतर नताशाचे पूर्ण पोट काढण्यात आले होते. पोट नसताना तिने अनेक हॉटेल, रेस्टंरटमध्ये काम केले होते. त्याच्या फॅनची संख्याही मोठी आहे.

पतीने दिली माहिती

नताशा डिड्डी हिच्या मृत्यूचे कारण अद्याप दिलेले नाही. परंतु नताशाने मागील काही मुलाखतींमध्ये आजाराचे संकेत दिले होते. तिने म्हटले होते की, अतिसार, मळमळ आणि जेवणानंतर चक्कर येणे किंवा थकवा यासारख्या विविध समस्यांनी तिला ग्रासले आहे.

पोटाच्या ट्यूमर झाल्यानंतर गेल्या 12 वर्षांपासून ती पोटाशिवाय जगत आहे. नताशा हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या पतीने पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, “जड अंतकरणाने मला हे सांगत आहे की, माझी पत्नी नताशा डिड्डी उर्फ द गुटलेस फूडी हिचे निधन झाले आहे. तिच्या निधनामुळे आमच्यावर दु:खाचे डोंगर कोसळले आहे”

युजर्सकडून अनेक आठवणींना उजाळा

नताशाच्या निधनानंतर इंस्टाग्राम युजरकडूननी शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेकांनी नताशाची परिस्थितीशी दिलेल्या लढ्याचे कौतूक केले आहे. तिच्यापासून आपणास आणखी प्रेरणा मिळाली, असे काही युजर म्हणत आहे. एक युजरने नताशाच्या पाककलेची आठवण सांगितली. तिने म्हटले की, मी नताशाच्या बऱ्याच पाककृती बनवल्या आहेत. तिची पोस्ट पाहणे मी कधीही चुकवत नव्हती.