MNS Vasant more: तब्बल! दीड तास उशीराने मनसे नेते वसंत मोरे बैठकीत दाखल

बैठक सुरु झाल्यानंतर तब्बल दीड तासांनी वसंत मोरे हे बैठकीसाठी दाखल झालेले दिसून आले आहे.वसंत मोरे यांचे शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहरातील स्थानिक नेते , कार्यकर्ते आणि आपल्यात सुसंवाद काय संवादही नाही, अशी नाराजी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली होती.

MNS Vasant more:  तब्बल! दीड तास उशीराने मनसे नेते वसंत मोरे बैठकीत दाखल
प्रातिनिधीक फोटो
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 15, 2022 | 1:46 PM

पुणे – शहरातील घोलरोड परिसरात मनसे(MNS) शहर पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडत आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणूक आणि अयोध्या दौऱ्यावर चर्चा केली जाणार आहे. मात्र या बैठकीच्या कार्यक्रम पत्रिकेतून मनसे कोअर कमिटीचे सदस्य वसंत मोरे (Vasant More) यांचे नाव वगळण्यात आल्याचे समोर आले होते. यानंतर वसंत मोरे यांनी ही स्थानिक नेत्यांकडून (Local Leader)  जाणीवपूर्वक हे कृत्य केले जात असल्याचा आरोपही करण्यात आला होता. बैठक सुरु झाल्यानंतर तब्बल दीड तासांनी वसंत मोरे हे बैठकीसाठी दाखल झालेले दिसून आले आहे.वसंत मोरे यांचे शहराध्यक्ष पद गेल्यानंतर शहरातील स्थानिक नेते , कार्यकर्ते आणि आपल्यात सुसंवाद काय संवादही नाही, अशी नाराजी त्यांच्या बोलण्यातून दिसून आली होती.

महापालिका निवडणूक व अयोध्या दौऱ्याबावबत चर्चा

शहर पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत राज ठाकरे यांच्या आगामी अयोध्या दौऱ्याबाबत चर्चा केली जाणार आहे. याबरोबरच आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातूनच महापालिके संदर्भातली रणनीतीवर चर्चा केली जाणार आहे. मात्र नेमकी काय चर्चा झाली आहे अद्याप समोर आलेले नाही

कोअर कमिटी आणि मोरे यांच्यात दुरावा

काही दिवसांपूर्वी शहर पातळीवर मला टाळले जात आहे, अशी जाहीर नाराजी मनसेचे नेते वसंत मोरे यांनी व्यक्त केली होती.  मी कोणालाही टाळत नाही, मात्र मला टाळले जात आहे, असे ते म्हणाले होते. त्याचबरोबर राज ठाकरे येतील तेव्हाच मी पक्ष कार्यालयात जाणार, शहराध्यक्ष पद गेल्यानंतर आज पहिल्यांदाच मोरे कोअर कमिटीसोबत पोलीस आयुक्तांना  भेटायला गेले होते. त्यावेळीही कोअर कमिटी आणि मोरे यांच्यात दुरावा दिसून आला. एकूणच काय तर पुणे मनसेत  वसंत मोरे सध्या एकाकी पडले आहेत.