धनंजय महाडिकांच्या अडचणीत वाढ, मुलाच्या शाही विवाह सोहळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

| Updated on: Feb 22, 2021 | 11:12 PM

धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR Filed Against Dhananjay Mahadik)

धनंजय महाडिकांच्या अडचणीत वाढ, मुलाच्या शाही विवाह सोहळ्याप्रकरणी गुन्हा दाखल
माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या मुलाचा विवाह सोहळा
Follow us on

पुणे : कोल्हापूरचे माजी खासदार आणि भाजप नेते धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या मुलाचा शाही विवाहसोहळा पार पडला होता. याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच लक्ष्मी लॉन्सचे विवेक मगर यांच्यासह तिघांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (FIR Filed Against BJP Leader Dhananjay Mahadik After son grand wedding during Corona Pandemic)

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह सोहळा पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्स येथे काल (रविवार 21 फेब्रुवारी) पार पडला होता. याबाबत मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस देण्यात आली होती. कोरोनासंबंधी नवे नियम आजपासून (सोमवार 22 फेब्रुवारी) लागू होणार असले तरी आधीच्या नियमावलीनुसार शंभर जणांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडण्याचे बंधन होते. मात्र या सोहळ्याला सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता.

याप्रकरणी धनंजय महाडिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यासोबतच लक्ष्मी लॉन्सचे विवेक मगर यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हडपसर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वऱ्हाडी कोण कोण?

धनंजय महाडिक यांचे पुत्र पृथ्वीराज महाडिक आणि वैष्णवी यांच्या लग्नाला शंभरपेक्षा अधिक पाहुणे उपस्थित होते. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अशा दिग्गजांनी हजेरी लावली होती. अनेक पाहुण्यांनी लग्नात मास्क नव्हते घातले. याप्रकरणी मंगल कार्यालयाच्या चालकाला नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर आता धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे विवेक मगर यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  (FIR Filed Against BJP Leader Dhananjay Mahadik After son grand wedding during Corona Pandemic)

कोण आहेत धनंजय महाडिक?

धनंजय महाडिक यांनी 2004 मध्ये कोल्हापूरमधून शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभेची निवडणूक लढवली होती. मात्र राष्ट्रवादीच्या सदाशिवराव मंडलिक यांच्याकडून महाडिकांचा पराभव झाला होता. त्यानंतर शिवसेनेला अलविदा करत महाडिक यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. परंतु 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी दिली नव्हती. त्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.

महाडिक यांना 2014 मध्ये राष्ट्रवादीने तिकीट दिले आणि त्यांनी लोकसभा गाठली. परंतु 2019 च्या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय सदाशिवराव मंडलिक यांनी महाडिकांना त्यांच्याच मतदारसंघात धूळ चारली. त्यानंतर सप्टेंबर महिन्यात धनंजय महाडिक यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यावेळी धनंजय महाडिक यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. (FIR Filed Against BJP Leader Dhananjay Mahadik After son grand wedding during Corona Pandemic)

संबंधित बातम्या : 

धनंजय महाडिक यांच्या मुलाचा शाही विवाह, पवार-फडणवीसांसह पाहुण्यांची गर्दी, पुण्यातील मंगल कार्यालयाला नोटीस