महिला केसरीतील मल्लांना मोबाईल टार्च घेऊन गाठावे लागले स्पर्धेचे ठिकाणी, रात्र काढली अंधारात

| Updated on: Mar 24, 2023 | 9:11 AM

कोरोनाच्या काळात जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासनाने कोरोना सेंटर सुरु केलं होतं. त्या सेंटरचे विजेचे बिल हे सहा ते सात लाख रुपये झाले आहे. ते लाईट बिल न भरल्यामुळे या ठिकाणी महावितरणने संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलाची वीज कनेक्शन तोडले. त्यामुळे रात्र अंधारात काढावी लागली.

महिला केसरीतील मल्लांना मोबाईल टार्च घेऊन गाठावे लागले स्पर्धेचे ठिकाणी, रात्र काढली अंधारात
सांगलीत दाखल झालेल्या महिला कुस्तीपटू
Follow us on

सांगली : महाराष्ट्रात पुरुषांप्रमाणे प्रथमच महिलांची महाराष्ट्र केसरी स्पर्धा (Maharashtra kesri kusti spardha) घेतली जात आहे. २३ मार्चपासून ही स्पर्धा सांगलीत सुरु झाली आहे. सुरु होण्यापूर्वीपासून ही स्पर्धा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कारण पुणे आणि सांगली अशा दोन ठिकाणी ही स्पर्धा होणार आहे. दोन्ही संयोजकांनी आपलीच स्पर्धा खरी असल्याचा दावा केला आहे. हा वाद सुरु असताना सांगलीत स्पर्धा सुरु झाली आहे. परंतु ढिसाळ नियोजनाचा फटका महिला कुस्तीपटूंना बसला आहे. विद्युत पुरवठा खंडीत असल्याने मुलींना रात्र अंधारात काढावी लागली.

नियोजन कोलमडले

हे सुद्धा वाचा


महाराष्ट्राच्या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सांगलीत पार पडत आहेत आणि या स्पर्धांसाठी राज्यातील जवळपास 400 अधिक महिला कुस्तीगिर दाखल झाल्या आहेत. मात्र कुस्ती स्पर्धांच्या ठिकाणी अत्यंत ढिसाळ नियोजन पाहायला मिळाले आहे. ज्या क्रीडा संकुलाच्या आवारामध्ये कुस्ती स्पर्धा होत आहेत, त्या ठिकाणी स्ट्रीट लाईट चालू नाही. यामुळे अंधारातून वाट काढत महिला कुस्तीपटूंना बाहेर पडावे लागत होतं. याशिवाय या महिला कुस्तीपटूंचे जेवणाची सोय करण्यात आली होती,त्या ठिकाणी ही अत्यंत ढिसाळ अशा पद्धतीचे नियोजन पाहायला मिळालं.

वीज बिल थकले, पुरवठा खंडीत

कोरोनाच्या काळात जिल्हा क्रीडा संकुलामध्ये जिल्हा प्रशासनाने कोरोना सेंटर सुरु केलं होतं. त्या सेंटरचे विजेचे बिल हे सहा ते सात लाख रुपये झाले आहे. ते लाईट बिल न भरल्यामुळे या ठिकाणी महावितरणने संपूर्ण जिल्हा क्रीडा संकुलाची वीज कनेक्शन तोडले. यामुळे गेली सहा सात महिने या परिसरात संपूर्ण अंधार आहे. सरकारने महावितरणचे सहा ते सात लाख रुपये थकीत बील न भरल्यामुळे गुरुवारी रात्री महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी आलेल्या महाराष्ट्रातील सर्व महिला खेळाडूंना त्रास सोसावा लागला. या ठिकाणी रस्त्यावर लाईटची सोयच नसल्याने हातात मोबाईल टॉर्च लाऊन महिला मल्लांना स्पर्धेचे ठिकाण गाठण्याची वेळ आली आहे.

जेवणासाठी रांगा


क्रीडा संकुलातील लहान मेसमध्ये महिला कुस्तीगिरसाठी जेवणाची सोय करण्यात आली होती. त्यामुळे रांगेने ताटकळत ठेवून या मुलींना आत सोडण्यात येत होतं. आसन व्यवस्था नसल्याने महिला कुस्तीपट्टूना खाली बसून जेवण करावे लागेल. पिण्याची पाण्याची व्यवस्था देखील नीट नव्हती. जेवण झाल्या नंतर हात धुण्यासाठी देखील कुस्तीगीर महिलांना पाण्याची व्यवस्था नव्हती.तर महिलांची राहण्याची व्यवस्था देखील नीट नसल्याच्या तक्रार करण्यात येत होत्या.