पुणे शहरात मोठा अपघात, पहाटे चार वाहने धडकली, दोन ठार

पुणे शहरात पुन्हा मोठा अपघात झाला आहे. पुणे येथील जांभूळवाडी दरी पुलावर हा अपघात झाला. शनिवारी पहाटे चार वाजता हा अपघात झाला. एकाचवेळी चार वाहने धडकली.

पुणे शहरात मोठा अपघात, पहाटे चार वाहने धडकली, दोन ठार
pune accidentImage Credit source: tv9 Marathi
Follow us
| Updated on: Nov 11, 2023 | 8:10 AM

प्रदीप कापसे, पुणे | 11 नोव्हेंबर 2023 : पुणे शहरात पुन्हा मोठा अपघात झाला आहे. पुणे येथील जांभूळवाडी दरी पुलावर हा अपघात झाला. शनिवारी पहाटे चार वाजता हा भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचवेळी चार वाहने एकमेकांना धडकली. टेम्पो पिक अप, कंटेनर, बस अशा वाहनांचा अपघात झाला. या अपघातात २ जणांचा मृत्यू तर ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातानंतर पुणे शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या अपघाताचा विषय पुन्हा चर्चेला आला आहे. काही दिवसांपूर्वीच पुणे येथे संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती झाली होती. उमेश हनुमंत वाघमारे या मद्यधुंद वाहन चालकाने एकामागे एक अनेक वाहनांना उडवले. रस्त्यावरुन चालणाऱ्या पदचाऱ्यांना धडक दिली. यामुळे पुण्यातील प्रसिद्ध झेड ब्रिजजवळ थरकाप उडाला. या अपघातात व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

अपघातानंतर तातडीने मदत कार्य

पुणे-बंगळुरू मार्गावर कात्रज येथील नव्या बोगद्याच्या आधी जांभूळवाडी येथे दरी पूल आहे. या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. साताऱ्याकडून येणाऱ्या एका भरधाव कंटेनरने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या ४ ते ५ वाहनांना जोरदार धडक दिली. पुणे जांभूळवाडी दरी पुलावर अपघात झाल्याची माहिती पोलिसांना मिळतात तातडीने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघातानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या जवानांनी सगळ्यांना जखमींना बाहेर काढले. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी महामार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरु केले.  सध्या महामार्गावरची वाहतूक सुरळीत झाली आहे.

पुणे शहरात 63 ठिकाणी ब्लॉक स्पॉट

2020 नंतर पुणे शहरातील अपघाताचे प्रमाण 113 टक्के वाढले आहे. यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यात अपघातांचे ‘ब्लॅकस्पॉट’ शोधण्यासाठी समिती तयार केली. या समितीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि परिवहन विभागाचे अधिकारी होते. त्यांनी ज्या ठिकाणी वारंवार अपघात त्या ठिकाणांची पाहणी केली. त्यानंतर शहर आणि जिल्ह्यांत 63 ठिकाणांनी ब्लॉक स्पॉट असल्याचे सांगण्यात आले. पुणे येथील नवले पूल आणि पुणे नगर महामार्गावर अपघातांचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले.

Non Stop LIVE Update
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.