AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे आहे की बिहार? हातात बिअरच्या बाटल्या घेत परप्रांतीय तरुणांचा डेक्कन परिसरात धिंगाणा

Pune: पुण्यातील डेक्कन पोलिसांनी दारूच्या नशेत भरधाव कारमधून स्टंटबाजी करणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या तरुणांनी मध्यरात्री पुण्यातील रस्त्यावर धिंगाणा घातला होता.

पुणे आहे की बिहार? हातात बिअरच्या बाटल्या घेत परप्रांतीय तरुणांचा डेक्कन परिसरात धिंगाणा
Pune car StuntsImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Aug 12, 2026 | 10:16 AM
Share

शिक्षणाचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक असणाऱ्या पुण्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेतच. पुण्यात दररोज नवनवीन प्रकरणे समोर येत आहेत. आता परप्रांतीय तरुणांनी रात्रीच्या वेळी पुण्यातील रस्त्यावर धिंगाणा घालत्याचे समोर आले आहे. हातात बिअरच्या बाटल्या घेऊन भरधाव कारमधून स्टंटबाजी केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी स्टंट करणाऱ्या चार तरुणांना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यात दारूच्या नशेत तरुणांनी भरधाव कारमधून स्टंटबाजी करत धुमाकूळ घातल्याचा प्रकार समोर आला आहे. सेनापती बापट रोड, नळ स्टॉप आणि डेक्कन परिसरात तरुणांनी कारच्या काचा उघडून, हातात बिअरच्या बाटल्या घेत स्टंटबाजी केली. दारुच्या नशेत असलेल्या तरुणांनी आपले अर्धे शरीर गाडीच्या खिडकीच्या काचेतून अर्धे बाहेर काढले होते. तसेच गाडी स्पीडमध्ये जात असताना जोरजोरात आरडाओरड सुरु होती.

वाचा: रेवती सुळेंच्या रिसेप्शनमधी त्या तरुणाची चर्चा, PM मोंदीनी ऐकला शब्द अन् शब्द, तो आहे तरी कोण?

पोलिसांनी केली चौघांना अटक

तरुणांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर डेक्कन पोलिसांनी चौघांना अटक केली. पोलिसांनी पहिले तरुणांच्या गाडीच्या नंबरप्लेट्स पाहिल्या. त्यावरुन शोध घेत डेक्कन पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. या चारही जणांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तरुण हरियाणातून पुण्यात मित्रांना भेटण्यासाठी आले होते. पार्टी केल्यानंतर नशेत हा प्रकार केल्याची माहिती समोर आली आहे.

सोशल मीडियावर या तरुणांचा व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. काहींनी तर हा महाराष्ट्र आहे बिहार नाही असा धिंगाणा इथे चालणार नाही असे देखील म्हटले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी केलेल्या कारवाईचे देखील कौतुक होत आहे. अनेकांनी पोलिसांनी तातडीने आरोपींना अटक केल्यामुळे कौतुक केले आहे.

Follow Us
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल