म्हणून त्यांचे आमदार सोडून गेले… हसन मुश्रीफ यांची थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावरच टीका; काय म्हणाले?

| Updated on: Aug 26, 2023 | 1:05 PM

2014ला ईडी होती का? 2017 ला ईडी होती का? 2022ला ईडी होती का? मग तेव्हा भाजपसोबत चर्चा का केल्या? 45 आमदार एकत्र येतात ते काय ईडीमुळे? हा सामूहिक निर्णय आहे. असो. आम्ही निर्णय घेतला. त्यावर चर्चा करणार नाही.

म्हणून त्यांचे आमदार सोडून गेले... हसन मुश्रीफ यांची थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावरच टीका; काय म्हणाले?
hasan mushrif
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

कोल्हापूर | 26 ऑगस्ट 2023 : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पहिल्यांदाच टीका केली आहे. मुश्रीफ यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावरच बोट ठेवलं होतं. शिवसेनाही हिंदुत्ववादी पक्ष होता. आम्ही त्यांच्यासोबत सत्तेत होतो. अडीच वर्ष आम्ही शिवसेनेसोबत चांगलं काम केलं. सहकार्य केलं. पण त्यांना आपलीच माणसं टिकवता आली नाही. त्यामुळे सत्ता गेली, अशी टीका हसन मुश्रीफ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर नाव न घेता केली. मुश्रीफ यांच्या या टीकेमुळे आता ठाकरे गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

हसन मुश्रीफ मीडियाशी संवाद साधत होते. मी अजित पवार यांच्यासोबत आहे. त्यांच्या नेतृत्वात आम्ही सत्तेत सहभागी झालो आहोत. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही सोबत गेलो आहोत. आम्ही का सत्तेत गेलो याचे सर्व खुलासे अजित पवार यांनी केले आहेत. भाजप आणि शिवसेना दोन्ही हिंदुत्ववादी पक्ष आहेत. आजही महाविकास आघाडीत शिवसेना असली तरी त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही. तरीही आम्ही त्यांच्यासोबत गेलो. अडीच वर्ष चांगलं काम केलं. सहकार्य केलं. पण त्यांना माणसं टिकवता आली नाही. त्यामुळे सत्ता गेली, असं हसन मुश्रीफ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

पवारांबरोबर अनेक चर्चा केल्या होत्या

पाचवेळा आपण भाजप बरोबर चर्चा केली. एक हिंदुत्ववादी पक्ष सोडला. दुसऱ्या हिंदुत्वावादी पक्षासोबत गेलोय. पक्षाच्या विस्तारासाठीच आम्ही हा निर्णय घेतला आहे. 45 आमदार आणि दोन तीन खासदार जातात याचा अर्थ हा सामूहिक निर्णय आहे. याबाबतच्या अनेक चर्चा आमच्या दैवतासोबत झाल्या होत्या. त्यानंतरच आम्ही निर्णय घेतला आहे, असा दावाही त्यांनी केला.

तेव्हा सही कशी केली?

यावेळी त्यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या टीकेचा समाचार घेतला. जितेंद्र आव्हाड हे मला फार ज्युनिअर आहेत. त्यांनी शरद पवारांवर काय जादू केली माहीत नाही. त्यांनी ठाण्यात राष्ट्रवादी पक्ष संपवला. त्यांनी अशी भाषा वापरायला नको होती. शिंदे गुवाहाटीला गेले होते. तेव्हा राष्ट्रवादीच्या 53 आमदारांनी पवारांना सह्याचं पत्रं दिलं होतं. आम्हाला सत्तेत जाण्याची परवानगी द्या, असं त्यात म्हटलं होतं. त्यावर आव्हाडांचीही सही होती. म्हणजे गृहनिर्माण खातं किती हृदयाला कवटाळून बसले होते. मग त्यावेळी कुठे गेला होता राधा सुता तुझा धर्म? त्यावेळी सही कशी केली होती? त्यावेळी भाजप हा हिंदुत्ववादी पक्ष आहे, हे माहीत नव्हतं का? पुरोगामी विचार कुठे गेला होता? असे सवाल त्यांनी केले.

सहानुभूती दाखवली नाही

शरद पवार नेते आहेत. त्यांचा सन्मान करतो. त्यांच्यावर नो कमेंट्स. जानेवारीत माझ्यावर ईडीची रेड पडली. आम्ही कोर्टातून दिलासा घेतला आहे. आमच्यावर कारवाई झाली नाही. आमच्या काही लोकांवर कारवाई झाली. त्यांना सहानुभूती दाखवली. पण माझ्याबाबत सहानुभूती दाखवली नाही, असा आरोपही त्यांनी केला.