Sushant Singh Case | महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं, मला कोर्टाच्या निर्णयाचा आदर : राजेश टोपे

पुण्यात आयसीयू बेडची संख्या वाढवत आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी (Health minister Rajesh Tope on Sushant Singh Rajput Death case) दिली.

  • योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे
  • Published On - 15:06 PM, 21 Aug 2020
Sushant Singh Case | महाराष्ट्र पोलिसांचं काम चांगलं, मला कोर्टाच्या निर्णयाचा आदर : राजेश टोपे

पुणे : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. याप्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना विचारले असता ते म्हणाले. मला कोर्टाच्या निर्णयाचा आदर आहे.  आपला देश कायद्यावर चालतो. महाराष्ट्र पोलीस विभाग चांगलं काम करत आहे. आपण त्यावर अविश्वास का दाखवायचा, हा विषय कोर्टात आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी याबाबत दिली. (Health minister Rajesh Tope on Sushant Singh Rajput Death case)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या सुपुत्र  पार्थ पवार हे माझे चांगले मित्र आहेत. त्यांच्याशी माझे बोलणे झालं आहे. पवार कुटुंब हे आदर्श कुटुंब आहे. पार्थचा विषय हा तात्पुरता आहे. तो घरात बसून मिटवला जाऊ शकतो, असे राजेश टोपेंनी यावेळी म्हणाले.

पुण्यात बेडची संख्या वाढणार 

मुंबईपाठोपाठ पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पुण्यात सध्या कोरोना वाढ दिसते, ती लवकरच खाली येईल असेही ते म्हणाले. पुण्यात बेडची अडचण नाही. येत्या काही दिवसात 4 हजार नवीन ऑक्सिजन बेड वाढवत आहे. आयसीयू बेडची संख्या वाढवत आहे, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमध्ये सरकार लक्ष देईल. महाराष्ट्राने देशात दिशादर्शकाचे काम केलं आहे. खाजगी हॉस्पिटलमध्ये 80 टक्के बेड मिळावे म्हणून दोन अधिकारी नेमले आहेत. रुग्णांचे बिल तपासले जावे म्हणून आम्ही ऑडिटेर नेमले आहे. जर बिल वाढले असेल तर अक्षम्य गुन्हा आहे. भरारी पथक नेमलं जाईल. त्याशिवाय कोरोनाच्या परिस्थितीत 450 सरकारी डॉक्टर कामावर हजर होत नाही, त्याचे काऊन्सिलिंग केले जाईल, अशी माहिती राजेश टोपेंनी दिली.

आता लॉकडाऊन विषय थांबवला आहे. आता अनलॉक करु, सर्व नियम आणि अटी पाळून पुढील काही महिने कोरोनासोबत जगावे लागेल. पुण्यात गणेशोत्सव मोठ्या पद्धतीने साजरा केला जातो. पण यावेळी कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने शासन नियमाप्रमाणे साजरा केला जात आहे, असेही ते यावेळी म्हणाले. (Health minister Rajesh Tope on Sushant Singh Rajput Death case)

संबंधित बातम्या : 

Sushant Singh Case | सत्यमेव जयते ! सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयावर, पार्थ पवार यांची प्रतिक्रिया

काम घोळत न ठेवता थेट निर्णय ही दादांची स्टाईल, अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया