Pune crime : बाल्कनीचे गज वाकवून चोरले तब्बल एक किलो सोन्यासह तीन किलो चांदीचे दागिने; हिस्ट्री शिटर पुणे पोलिसांच्या ताब्यात

| Updated on: Jul 03, 2022 | 4:04 PM

माहितीच्या आधारे, पोलिसांकडून परिसरात सापळा रचण्यात आला आणि शकील अन्सारी (34) उर्फ बोना उर्फ मुस्तफा या संशयितास अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत बिबवेवाडी फ्लॅट फोडण्यात त्याचा सहभाग उघड झाला.

Pune crime : बाल्कनीचे गज वाकवून चोरले तब्बल एक किलो सोन्यासह तीन किलो चांदीचे दागिने; हिस्ट्री शिटर पुणे पोलिसांच्या ताब्यात
सांगलीत बडोदा बँकेची 16 कोटीं 97 लाखाची फसवणूक
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : एक किलो सोन्यासह तीन किलो चांदी चोरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. बिबवेवाडी परिसरात हा प्रकार घडला होता. पुणे शहर पोलिसांच्या (Pune city police) गुन्हे शाखेने बिबवेवाडी परिसरात एका फ्लॅटमधून सुमारे एक किलो सोने आणि तीन किलो चांदीचे दागिने चोरल्याप्रकरणी (Jewellery theft) एका व्यक्तीला अटक केली आहे. 20 जून रोजी येथील एका अपार्टमेंटमध्ये घरातील सर्व लोक कुत्र्याचे पिल्लू विकत घेण्यासाठी बाहेर पडले असताना घर फोडल्याची ही घटना घडली. चोरट्याने बाल्कनीच्या खिडकीचे ग्रील वाकवून घरात प्रवेश केला आणि सोन्या-चांदीचा मौल्यवान ऐवज लंपास केला होता. त्यानंतर याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला. अन्सारी (34) उर्फ बोना उर्फ मुस्तफा या संशयित आणि हिस्ट्री शिटर गुन्हेगारास अटक (History shitter criminal arrested) करण्यात आली आहे.

खडीमशीनमध्ये नातेवाईकांना भेटायला आला आणि…

शनिवारी गुन्हे शाखेच्या युनिट-1च्या अधिकाऱ्यांना चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या संशयितांची माहिती गोळा करत असताना, अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये हवा असलेला हिस्ट्री शीटर खडीमशीन परिसरात येत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. नातेवाईकाला भेटण्यासाठी हा आरोप कोंढवा परिसरात येत असल्याची खबर पोलिसांना मिळाली.

हे सुद्धा वाचा

तब्बल 18 गुन्हे आहेत दाखल

माहितीच्या आधारे, पोलिसांकडून परिसरात सापळा रचण्यात आला आणि शकील अन्सारी (34) उर्फ बोना उर्फ मुस्तफा या संशयितास अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीत बिबवेवाडी फ्लॅट फोडण्यात त्याचा सहभाग उघड झाला. अन्सारीला पुढील तपासासाठी बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले. गुन्हे शाखेच्या युनिट-1चे प्रभारी निरीक्षक संदीप भोसले यांनी सांगितले, की अन्सारी हा गुन्हेगार असून त्याच्यावर पुण्यातील खडक, वानवडी, कोंढवा आणि मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात तसेच हैदराबादसह तब्बल 18 गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल आहेत. आता या आरोपीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. त्या 18 गुन्ह्यांसह इतर आणखी कोणत्या गुन्ह्यात त्याचा सहभाग आहे, का याचा तपास पोलीस करीत आहेत.