जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार, अजितदादांचा दावा; केंद्र सरकारवरही टीका

| Updated on: Aug 29, 2021 | 1:33 PM

भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांची जिथे जिथे जन आशीर्वाद गेली. त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. (jan ashirwad yatra will increase coronavirus, says ajit pawar)

जन आशीर्वाद यात्रेमुळे कोरोना वाढणार, अजितदादांचा दावा; केंद्र सरकारवरही टीका
ज्या मोदी सरकारच्या निर्णयाला अजित पवारांनी विरोध केला, आता त्यांच्यावरच 'सुधारणे'ची जबाबदारी
Follow us on

पुणे: भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांची जिथे जिथे जन आशीर्वाद गेली. त्या ठिकाणी कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढणार आहे, असा दावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवरही टीका केली. (jan ashirwad yatra will increase coronavirus, says ajit pawar)

अजित पवार यांनी मीडियाशी संवाद साधताना हा दावा केला. केंद्र सरकार देशातील सर्व राज्यांना कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला गांभीर्याने घ्यायला सांगितलं आहे. लक्ष द्या लक्ष द्या म्हणून सरकार सांगतं. दुसरीकडे नव्या मंत्र्यांना यात्रा काढायलाही सांगतं. या यात्रांमुळे फटका बसणार आहे. जिथे जिथे जन आशीर्वाद यात्रा गेली तिथे तिथे कोरोनाची लागण वाढलेली दिसेल, असं पवार म्हणाले.

सण साजरे करताना काळजी घ्या

आपल्याकडे अनेक सण आनंदाने करतो. एकीकडे केंद्र सरकार सांगतं कोरोना आहे काळजी घ्या. चार नवीन मंत्र्यांना मात्र यात्रा काढायला सांगितलं जातं. याला कोण जबाबदार आहे? नंतर कोरोना वाढला तर याचा विचार केंद्राने करावा, असं ते म्हणाले. जिथं राजकारण करायच आहे तिकडे सगळे राजकारण करू. पण जिथं जनतेचा प्रश्न आहे, तिकडे सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. त्यामुळे सण साजरे करताना काळजी घ्या, असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं.

राणेंना उत्तर

केसेस कशा रद्द करायच्या हे अजित पवार यांच्याकडून शिकावं, असा टोला केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी लगावला होता. त्यावर पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला त्याबद्दल जास्त बोलायचं नाही. मला नारायण राणे बाबत चर्चा करायची नाही. त्यांचं त्यांना लखलाभ. आम्हाला सरकार चालवायच आहे. ते केंद्रात मंत्री आहेत. आम्ही राज्यात मंत्री आहोत. त्यांनी केंद्राची कामे करावी, आम्ही राज्यातील कामं करणार, असं ते म्हणाले.

नव्या महापालिकेच्या निर्मितीवर चर्चा

पीएमआरडीए बाबत बैठक पार पडली. एक बैठक मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाली होती. त्याबाबत आज खासदार, आमदारांना एक ड्राफ्ट दाखवला. अनेकांनी सूचना दिल्या. अजून एक बैठक मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे. त्यानंतर त्यातील अनेक मागण्यांबाबत चर्चा होईल. पुणे आणि आजूबाजूचा परिसर वाढतच आहे. त्यामुळं भविष्यात जर नवीन महापालिका करायची झाली तर त्याबाबत काय नियोजन करायचं त्याबाबत चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं.

रिपोर्ट पाहूनच बोलेन

मला अनिल देशमुखांबाबत रिपोर्ट मिळत नाही, तोपर्यंत मी यावर बोलणार नाही. अनेक चौकश्या होत असतात. त्यावेळी सगळे चौकशीसाठी मदत करत असतात. त्यामुळे यावर बोलणार नाही, असं त्यांनी सांगितलं. (jan ashirwad yatra will increase coronavirus, says ajit pawar)

 

संबंधित बातम्या:

देशात तिसऱ्या लाटेची घंटा वाजतेय? नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ, सक्रिय रुग्णसंख्या 3.68 लाखांवर

VIDEO: बाळासाहेबांच्या जीवाला धोका, पवारांनी सांगितलं ‘मातोश्री’ सोडा, तेव्हा साहेबांनी मलाच बोलावलं; राणेंनी सांगितला ‘तो’ अनुभव

अनिल देशमुखांबाबतचं सत्य, असत्य काय?, सीबीआयने खुलासा करावा; नवाब मलिक यांची मागणी

(jan ashirwad yatra will increase coronavirus, says ajit pawar)