सहचारिणीचा सह’विजय’, पुण्यात शेळके दाम्पत्याची ग्रामपंचायतीत बाजी

| Updated on: Jan 19, 2021 | 2:23 PM

संसारात केवळ राजकारणाच्या गप्पा सतत ऐकायला मिळणारी 'ती', आज आपल्या पतीराजांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणातील अर्धांगिनी बनली आहे.

सहचारिणीचा सहविजय, पुण्यात शेळके दाम्पत्याची ग्रामपंचायतीत बाजी
Follow us on

पुणे : घराला तसा राजकीय वारसा म्हणावा तर जेमतेम दहाच वर्षांचा (Junnar Shelke Husband And Wife Won Gram Panchayat Election). पतीचा राजकारणात ग्रामपंचायत सदस्य ते उपसरपंच असा राजकीय प्रवास अगदी डोळ्यासमोर पाहायला आणि अनुभवायला मिळाला तो लग्न झाल्यापासूनच. पतीला असणारी राजकारण आणि समाजकारणाची आवड, घरीदारी संसारातही केवळ राजकारणाच्या गप्पा सतत ऐकायला मिळणारी ‘ती’, आज आपल्या पतीराजांच्या खांद्याला खांदा लावून राजकारणातील अर्धांगिनी बनली आहे (Junnar Shelke Husband And Wife Won Gram Panchayat Election).

संसाराबरोबरच गावगाडा चालविण्यास मी देखील पतीराजांना सोबत करणार असे ठाम सांगू लागली आहे. जुन्नर तालुक्यातील धनगरवाडीची प्रियांका शेळके.

जुन्नर तालुक्यातील धनगरवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र. 3 मधून एका जागेसाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तर दोन जागांसाठी लढत झाली. विशेष म्हणजे या प्रभागातून महेश जयवंत शेळके आणि प्रियांका महेश शेळके हे पतीपत्नी विजयी झाले आहेत. एकाच प्रभागातून पती-पत्नी निवडणूक लढवून विजयी होणारं हे पुणे जिल्ह्यातील हे एकमेव उदाहरण आहे (Junnar Shelke Husband And Wife Won Gram Panchayat Election).

महेश शेळके यांचं शिक्षण बीएससी केमिस्ट्रीमधून झालं असून विधेयक कामात त्यांचं नेहमीच योगदान आहे. महेश शेळके हे मागील दहा वर्षांपासून ग्रामपंचायतमध्ये कार्यरत आहेत. तर 2010 मध्ये त्यांनी उपसरपंच म्हणून काम पाहिले होते.

महेश शेळके आणि प्रियांका शेळके यांचा चार वर्षांपूर्वी विवाह झाला. प्रियांका यांनी इंजिनिअरिंग झालं असून त्या गृहिणी आहेत. एकाच प्रभागातून निवडणूक लढवत असताना एकाच घरातील दोघांना जनता स्वीकारेल की नाही किंवा पतीच्या लोकप्रियतेमुळे निवडणूक सहज आणि सोपी होईल अशा चर्चेला ऊत आलेला असतानाच दोघांनीही बाजी मारली आहे.

महेश शेळके यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम राबविले आहेत. कोरोना काळात आजवर अनेक गोरगरिबांना मदत केली आहे. सध्या या नवरा बायकोच्या विजयाची चर्चा सर्वत्र सुरु आहे.

Junnar Shelke Husband And Wife Won Gram Panchayat Election

संबंधित बातम्या :

ग्रामपंचायत निवडणूक : रिअ‍ॅलिटी चेक करा, भाजप चौथ्या नंबरचा पक्ष, सत्यजित तांबेंचा टोला

अशी निवडणूक जिथं एक पॅनल प्रमुख पडला, एक पडता पडता राहीला, एकाची बायको पडली, एका मतानं उमेदवार पडला

Maharashtra Gram Panchayat Election Results 2021: एमबीए शिकलेला तरुण बनला ग्रामपंचायत सदस्य; गावात घडवलं सत्तांतर