अहो आहात कुठे..? बाईकच्या भावात बोकड… चाकणच्या बाजारात खरेदीसाठी प्रचंड झुंबड

बकरी ईदच्या काही दिवसआधीच बोकड खरेदीसाठी चाकण बाजारपेठेत प्रचंड गर्दी. राज्यातील विविध भागांमधून आलेल्या बोकडांना मिळतोय लाखो रुपयांपर्यंत भाव.

| Updated on: May 16, 2026 | 4:58 PM
1 / 6
बकरी ईद अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्याने पुणे जिल्ह्यातील चाकण येथील जनावरांच्या बाजारात सध्या मोठी लगबग आणि गर्दी पाहायला मिळत आहे. ईदच्या पार्श्वभूमीवर विविध भागांतून व्यापारी, शेतकरी आणि नागरिक मोठ्या संख्येने बोकड खरेदीसाठी बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ गजबजून गेली असून खरेदी-विक्रीला वेग आला आहे.

2 / 6

यंदाच्या बाजारात स्थानिक जातींसोबतच राजस्थान, सोलापूर, अहमदनगर आणि इतर भागांतून खास बोकड विक्रीसाठी आणण्यात आले आहेत. विविध रंग, उंची आणि वजनाचे बोकड बाजारात ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.

3 / 6

काही व्यापाऱ्यांनी विशेष देखभाल केलेले आणि आकर्षक सजवलेले बोकडही बाजारात आणले आहेत. त्यामुळे खरेदीदारांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

4 / 6

बोकडांच्या जाती, वजन आणि आरोग्यानुसार त्यांच्या किंमती ठरत आहेत. साधारण बोकडांची किंमत हजारांपासून सुरू होत असली तरी काही खास जातींच्या बोकडांना लाखांच्या घरात मागणी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

5 / 6

विशेषतः राजस्थान आणि सोलापूर भागातील उंच व वजनदार बोकडांना ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. अनेक ग्राहक आधीच बुकिंग करून पसंतीचे बोकड खरेदी करत असल्याचेही चित्र पाहायला मिळत आहे.

6 / 6

बकरी ईदच्या निमित्ताने चाकणच्या जनावरांच्या बाजारात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत आहे. आतापर्यंत या बाजारात तब्बल सात ते आठ कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत गर्दी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात असून उलाढालीतही वाढ होण्याची अपेक्षा आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us