Ketan Agarwal Case : त्या एका माणसाला माहित होतं केतन 18 जूनला मरणार आहे, तो वाचवू शकला असता..तपासात नवीन धक्कादायक माहिती समोर

Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात नवीन माहिती समोर आली आहे. या केसमध्ये दररोज नवनवीन आणि चक्रावून टाकणारे खुलासे सुरु आहेत. केतन सोबत 18 जूनला काय होणार, हे एका माणसाला आधीच कळलेलं. पोलिसांनी त्या व्यक्तीला शोधून काढलं आहे.

Ketan Agarwal Case : त्या एका माणसाला माहित होतं केतन 18 जूनला मरणार आहे, तो वाचवू शकला असता..तपासात नवीन धक्कादायक माहिती समोर
Ketan Agarwal Case
| Updated on: Jul 04, 2026 | 8:52 AM

पुण्याच्या हाय-प्रोफाइल केतन अग्रवाल प्रकरणात दररोज नवीन आणि चक्रावून टाकणारे खुलासे सुरु आहेत. देशभरात चर्चेचा विषय बनलेल्या या प्रकरणाचं आता बीड कनेक्शन समोर आलं आहे. चेतन चौधरी आणि सिया गोयलने केतनला संपवण्याआधी त्यांच्या एका अत्यंत जवळच्या मित्रासोबत या विषयी चर्चा केली होती. पोलिस तपासात आता ही बाब समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस बीड जिल्ह्यात राहणाऱ्या या युवकाची आता चौकशी करत आहेत. त्यानंतर या प्रकरणात अजून महत्वाचे धागेदोरे हाती लागू शकतात. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यात राहणारा युवक चेतन चौधरीचा वर्गमित्र आहे. सध्या तो पुणे बालेवाडी येथे एका खासगी कंपनीत नोकरी करतो.

चेतन आणि सियाने मे च्या अखेरच्या आठवड्यात या युवकाशी संपर्क साधला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांनी सर्वात आधी या युवकाला केतन अग्रवाल सोबत काय करणार आहोत, ती सगळी योजना आणि रणनिती सांगितली. त्याच्याशी या बद्दल सविस्तर चर्चा केली. प्लाननुसार चेतन आणि सियाने या मित्राला 18 जून रोजी लोहगड किल्ल्यावर फिरायला जाऊ असही सांगितलं होतं. युवकाने त्यांच्यासोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला. चेतन आणि सियाने त्या मित्राला या सर्व प्लानबद्दल सांगितल्यानंतर त्याने असं करु नका, असा सल्ला सुद्धा दिला होता. पोलीस सूत्रांनी ही माहिती दिली.

सर्व डिजिटल रेकॉर्ड्सची सखोल चौकशी

या सगळ्या प्रकरणात पोलिसांना अनके डिजिटल पुरावे सुद्धा मिळाले आहेत. तपासात हे सुद्धा समोर आलय की, केतन अग्रवालला मार्गातून हटवल्यानंतर चेतन चौधरी आणि सिया अग्रवालने पुन्हा या मुलाची भेट घेतली होती. पुणे ग्रामीण पोलीस सध्या या युवकाने कॉल डिटेल्स रेकॉर्ड, व्हॉट्सअप चॅट, लोकेशन हिस्ट्री आणि सर्व डिजिटल रेकॉर्ड्सची सखोल चौकशी करत आहेत.

भितीमुळे तो गप्प राहिला की..

या खुलाशा नंतर बीडच्या त्या युवकाबद्दलही अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत?. जर, त्या मुलाला केतन अग्रवाल सोबत काय होणार हे आधीच कळलं होतं, तर त्याने केतनच्या कुटुंबाला किंवा पोलिसांना या बद्दल का सूचित केलं नाही?. भितीमुळे तो गप्प राहिला की, यामागे अजून काही करण आहे?

त्या मुलाने चेतन-सियाच्या या प्लानबद्दल अजून कोणाला काही सांगितलय का?

पुणे पोलिसांनी बीडच्या या युवकाला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरु आहे. पोलीस प्रामुख्याने तीन पॉइंटवर तपास करत आहेत. चेतन आणि सियाने त्याला प्लानबद्दल काय-काय माहिती सांगितलेली, त्या मुलाने चेतन-सियाच्या या प्लानबद्दल अजून कोणाला काही सांगितलय का?. चेतन-सियाने आपल्या प्लानमध्ये या बीडच्या मुलाचाच समावेश करण्याचा निर्णय का घेतला? पोलीस प्रत्येक अँगलने या मुलाची कसून चौकशी करत आहेत. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारावर पुढच्या तपासाची दिशा ठरणार आहे.

Follow Us