Ketan Murder Case: सियाचा भाऊ साहिल गोयल गोत्यात… 10 कोटी रुपयांच्या नुकसानीची नोटीस… केतन अग्रवाल हत्या प्रकरणात तो मोठा ट्विस्ट
Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल हा अडचणीत सापडला आहे. साहिलला 10 कोटी रुपयांच्या नुकसानीची नोटीस बजावण्यात आली आहे. चौकशी दरम्यान साहिल याच्या जबाबानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे.

Siya Goyal Sahil Goyal Ashutosh Srivastava : केतन अग्रवाल खून प्रकरणात आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल मोठ्या अडचणीत सापडला आहे. याप्रकरणात हायहोल्टेज ड्रामा समोर आला आहे. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले. या दोघांना पुन्हा सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्याची विनंती केली. यावेळी कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद रंगला. सुनावणीअंती न्यायालयाने दोघांना 3 जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
साहिल गोयलला 10 कोटींची कायदेशीर नोटीस
केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासादरम्यान आता एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे. आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयल याला अॅडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे. वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणीदरम्यान सिया गोयलने “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत,” असे सांगितल्याची माहिती समोर आल्यानंतर हा वाद अधिक चिघळला आहे.
साहिल गोयलने खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप करून आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवल्याचा दावा करत आशुतोष श्रीवास्तव यांनी 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. तसेच आरोप मागे घेऊन सार्वजनिक माफी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन देण्याचीही मागणी नोटिशीत करण्यात आली आहे. आता या कायदेशीर नोटिशीला साहिल गोयल काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
साहिल आणि आई-वडीलांची चौकशी
18 जून रोजी लोहगड किल्ल्यावरील कठड्यावरून त्याला ढकलून दिले. दरीत कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रेम ट्रँगल समोर आल्यानंतर पोलिसांनी हा अपघात नसून घातपात असल्याच्या दृष्टीने तपास सुरू केला. सियासह चेतन चौधरीला अटक केली. याप्रकरणात गोयल कुटुंबियातील सदस्यांची कसून चौकशी करण्यात आली. शुक्रवारी सियाचा भाऊ आणि चेतनचा मित्रा साहिल गोयलची दहा तास चौकशी झाली तर शनिवारी सियाच्या आई-वडीलांची चौकशी झाली. या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सियाच्या कटाची माहिती नसल्याचा दावा करण्यात आला.
आता सोशल मीडिया खात्याचा तपास
केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यात काय काय चर्चा झाली. दोघांनी काय काय चॅट केले. व्हॉट्सॲपशिवाय इतर कोणत्या सोशल मीडिया ॲपचा वापर केला आहे. कोणत्या संकेतस्थळांचा वापर केला याचा डिजिटल तपास सुरू करण्यात आलेला आहे. त्यातून दोघांविरोधात भक्कम पुरावा समोर येण्याची शक्यता आहे.