Ketan Murder Case: तिच्याविरोधात पोलिसांकडे साक्षीदारच… सिया गोयलच्या वकिलांच्या त्या दाव्यानं मोठी खळबळ, अपडेट काय?

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल खून खटल्यातील आरोपी सिया गोयल हिच्या वकिलांनी एक मोठा दावा केला आहे. केतन अग्रवाल हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील असतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवला जाणार आहे.

Ketan Murder Case: तिच्याविरोधात पोलिसांकडे साक्षीदारच... सिया गोयलच्या वकिलांच्या त्या दाव्यानं मोठी खळबळ, अपडेट काय?
केतन अग्रवाल, सिया गोयल, चेतन चौधरी
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 27, 2026 | 10:27 AM

Ketan Agarwal Lohgad Murder Case: देशभरात गाजत असलेल्या हायप्रोफाईल केतन अग्रवाल खूनप्रकरणाला कायदेशीर वळण मिळाले आहे. आरोपी सिया गोयल आणि आरोपी चेतन चौधरी यांना 7 दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे. तर राज्यसभेचे खासदार, ज्येष्ठ विधीज्ञ उज्ज्वल निकम यांची या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्यास मंजूरी दिली आहे. काल मुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर होते. केतनच्या आई-वडिलांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यानंतर अनेक घाडमोडी समोर आल्या. दरम्यान सिया अग्रवाल हिचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी मोठा दावा केला आहे.

न्याय देण्यासाठी कोणती कसूर नाही

काल केतन अग्रवालच्या आई-वडीलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीचा वृत्तांत समोर आला आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने याविषयीचे ट्विट केले आहे. त्यानुसार, “लोणावळा ग्रामीण परिसरात झालेल्या केतन अग्रवाल यांच्या दुर्दैवी हत्येच्या प्रकरणात केतन अग्रवाल यांचे वडिल विशाल अग्रवाल यांनी आज पुण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपल्या मुलाला न्याय मिळावा, अशी मागणी केली. या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कुटुंबीयांना न्याय देण्यासाठी कोणतीही कसूर ठेवली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी त्यांना दिले. या प्रकरणात जलदगती न्यायालय आणि विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची त्यांची मागणी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ मान्य केली आणि तसे निर्देश विधी व न्याय विभागाच्या सचिवांना दिले. ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम यांनीही या प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून काम पाहण्यास संमती प्रदान केली आहे.” असे ट्विट CMO कार्यालयाने केले आहे.

पोलिसांकडे कोणताही ठोस पुरावा नाही

आरोपी सिया गोयल हिची बाजू आशुतोष श्रीवास्तव मांडणार आहेत. या खटल्यासंदर्भात त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला प्रतिक्रिया दिली. सियाच्या विरोधात पोलिसांकडे कोणताही ठोस स्वतंत्र साक्षीदार नसल्याचा दावा त्यांनी केला. ही घटना सुरुवातीला अपघाती मृत्यू म्हणून नोंदवली गेली. नंतर पोलिसांनी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केला. भारतीय साक्ष अधिनियमाच्या कलम 23 नुसार, पोलिसांसमोर दिलेला कोणताही जबाब न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरला जात नाही असे त्यांनी सांगितले. मॅजिस्ट्रेटसमोर जर असा जबाब नोंदवला आणि पोलीस अनुपस्थित असतील तर परिस्थिती वेगळी असते. तर भारतीय कायद्यानुसार, कोणत्याही आरोपीला स्वतःच्या विरोधात साक्ष देण्यासाठी दबाव आणता येत नाही ,असेही ते म्हणाले.

18 जून रोजी केतन अग्रवाल याची हत्या करण्यात आली. सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून ढकलले. खोल दरीत कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यूनंतरतपासात लव्ह ट्रँगल समोर आला. हा घातपात असल्याचे समोर येताच पोलिसांनी त्याची भावी वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली. या खून प्रकरणाने राज्य हादरले.

Follow Us