AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Agarwal: त्या दिवशी तिने ठरवले त्याला संपवायचे… सिया गोयलचा खतरनाक प्लॅन… अन् 18 दिवसांनी तिने गेम केलाच, तो खळबळजनक खुलासा

Ketan Agarwal Lohagad Murder Case: केतन अग्रवाल याला ठार करण्याचा विचार पहिल्यांदा सिया गोयलला कधी सुचला या प्रश्नाचे उत्तर उलगडण्यात पोलिसांना यश आले आहे. तिच्या मनात अगोदर असला विचार नव्हता. पण त्यादिवशी जेव्हा केतन तिला दिसला, त्याचवेळी तिने ठरवले याला संपवायचे, काय आहे तो खळबळजनक खुलासा?

Ketan Agarwal: त्या दिवशी तिने ठरवले त्याला संपवायचे... सिया गोयलचा खतरनाक प्लॅन... अन् 18 दिवसांनी तिने गेम केलाच, तो खळबळजनक खुलासा
केतन खूनप्रकरणात तो खळबळजनक खुलासा Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 26, 2026 | 10:28 PM
Share

Ketan Agarwal Lohagad Murder Case: केतन अग्रवाल याचा अत्यंत निर्दयीपणे खून करूनही सिया गोयल हिला कसलाही पश्चाताप नसल्याचे समोर आले आहे. सियाने तिचा प्रियकर चेतन चौधरी याच्या सोबत मिळून केतन याला लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलले. त्यानंतर पाय घसरून पडल्याचा बनाव केला. पण केतनच्या बहिणीला तिच्यावर संशय आल्याने पुढे पोलिसांनी या प्रकरणाची पाळंमुळं खोदली. आता तपासात एक खळबळजनक बाब समोर आली आहे. सुरुवातीला केतनला मारण्याचे तिच्या मनात नव्हते. पण त्यादिवशी केतनला पाहताच त्याला ठार करण्याचा खतरनाक प्लॅन तिने मनाशी पक्का केला. 18 दिवसांनी तिने त्याला संपवाला. प्रियकरासोबत तिचे जीवन अंधारमय झाले आहे.

18 जून रोजी लोहगडावरून ढकलले

18 जून रोजी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांनी केतन अग्रवाल याला लोहगड किल्ल्याच्या कड्यावरून ढकलले. खोल दरीत कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या योग्य तपासामुळे हा अपघात नसून घातपात असल्याचे समोर येताच राज्यात मोठी खळबळ उडाली. पोलिसांनी त्याची भावी वधू सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक केली. न्यायालयाने दोघांना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आपण मोठी चूक केल्याचे चेतनला वाटत आहे. पण सियाला कोणताही पश्चाताप झालेला नाही, अशी माहिती पोलिसांकडून मिळत आहे.

लोहगडावर खुणवाखुणवी

18 जून रोजी चेतन चौधरी हा अगोदरच गडाच्या पायथ्याशी आला. त्याने व्यायमासाठी आल्याचे सांगत तिकीट घेतले नाही. पण तो अवघ्या 40-45 मिनिटात गड उतरून खाली आल्याचे सीसीटीव्हीतून समोर आले आहे. गड चढायला जवळपास 25 मिनिटे लागतात. उतरायला 15 मिनिटे लागतात. मध्यला 8 मिनिटे तो त्या निर्जनस्थळी केतन आणि सियाची वाट पाहत थांबलेला होता, हे गणित आता पोलिसांसमोर आले आहे. तर त्यादिवशी चेतन आपल्या मागे येत आहे की नाही हे सिया पाहत होती. चेतनने हात हालवून तिला प्रतिसाद दिला. तर सियानेही तशीच कृती करत हात तोंडावर धरला. पण चेतन गड उतरताना त्याने एकदाही मान वर केल्याचे समोर आले नाही. कॅमेरा मागे जाईपर्यंत त्याने हुडीने चेहरा झाकलेला होता.

31 मे रोजी तिने ठरवले, त्याला संपवायचे

31 मे रोजी सिया आणि केतन अग्रवाल हे लोहगड किल्ल्यावर गेले होते. तिथे केतन हा एका धोक्याच्या ठिकाणी बसलेला होता. तो केव्हाही दरीत कोसळले अशी भीती होती. त्याविषयी दोघात चर्चाही झाली. पण केतनने तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. तेव्हाच सियाच्या मनात पहिल्यांदा केतनला याच किल्ल्याच्या कठड्यावरून दरीत ढकलण्याची कल्पना सुचली आणि तिने त्यानंतर त्याला संपवण्याचे तीन अयशस्वी प्रयत्न केले. यापूर्वी तिने एकदा किल्ल्यावरून त्याला धक्काही दिला. पण झाडाची फांदी त्याच्या हाती आली आणि तो वाचला. साप पायाखाली आल्याचा बनाव करत सियाने त्यावेळी वेळ मारून नेली होती. पण 18 जून रोजी केतनचा तिने काटा काढला.

Follow Us
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन
राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात...
Lalbaugcha Raja Visarjan : राजाची शेवटची आरती संपन्न थोड्याच वेळात राजाचा तराफा खोल समुद्रात जाणार
थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
Lalbaugcha Raja Visarjan | थोड्याच वेळात लालबागच्या राजचं विसर्जन होणार, भाविकांचे डोळे पाणावले
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती
Anant Ambani : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी अनंत अंबानी गिरगाव चौपाटीवर उस्थिती