AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ketan Murder Case: केतनच्या हत्येत अजून काहींचा सहभाग… मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर अनिल अग्रवाल यांचा मोठा गौप्यस्फोट… कुणावर शंका?

Anil Agarwal Big Statement: केतन अग्रवाल याची लोहगड किल्ल्यावरून खोल दरीत ढकलून देऊन हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी प्रेयसी सिया गोयल हिच्यासह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आज केतनच्या वडीलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मोठी मागणी केली.

Ketan Murder Case: केतनच्या हत्येत अजून काहींचा सहभाग... मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर अनिल अग्रवाल यांचा मोठा गौप्यस्फोट... कुणावर शंका?
अनिल अग्रवाल, देवेंद्र फडणवीसImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 26, 2026 | 1:38 PM
Share

Anil Agarwal Meet Devendra Fadnavis: केतन अग्रवाल खून प्रकरणात दिवसागणिक नवनवीन खुलासे होत आहे. अग्रवाल कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. तर भावी नवऱ्याचा खून करणारी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात केवळ हे दोघेच नाही तर अजून काहींचा हात असल्याचा दावा केतनचे वडील अनिल अग्रवाल यांनी केला आहे. त्यामुळे याप्रकरणात अजून काही जणांची धरपकड होण्याची शक्यता आहे. अनिल अग्रवाल यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा अथवा कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.

सिया दारू पित असल्याचे आले समोर

माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरवसा आहे. एलसीबी टीम, लोणावळ्यातील गुन्हे शाखा आणि एसपी गिल यांनी याप्रकरणात चांगले काम केले आहे. त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. पण अजूनही त्यांचा तपास सुरू आहे. सीसीटीव्हीत अनेक गोष्टी समोर येत आहे. त्याआधारे ते अजून खुलासे करत आहेत. पण त्यांनी मला अजून सांगितलेले नाही. सिया दारू पित असल्याचे आम्हाला माहिती नव्हते. तिच्या कुटुंबियांनी ती पार्टी वगैरे करत नसल्याचे म्हटले होते. पण आता या गोष्टी समोर येत आहे. सियाचा भाऊ साहिल आणि चेतन चौधरी हे मित्र होते. त्यामुळे त्यालाही या सर्व कटाची माहिती असू शकते. दोघेही मित्र होते. अशी माहिती अनिल अग्रवाल यांनी दिली.

याप्रकरणात अजून काहीचा सहभाग

केतन अग्रवाल प्रकरणात अजून काहींचा सहभाग असू शकतो असा दावा त्याचे वडील अनिल अग्रवाल यांनी केला आहे. पोलीस याप्रकरणी तपास करत असल्याने त्यांनी त्यावर अधिक बोलण्यास नकार दिला. तर केतनच्या डोक्याला विगचा एक छोटासा पॅच लावलेला होता. ही माहिती आम्ही लग्न ठरवण्यापूर्वी सियासह तिच्या कुटुंबाला दिली होती. आम्ही ही गोष्ट लपवली नाही. हीच बाब कबुलीजबाबात समोर आल्याचेही ते म्हणाले.

न्याय द्या, आई-वडिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. केतन अग्रवालचे आई-वडीलांनी त्यांची भेट घेतली आणि न्याय देण्याची मागणी केली. याप्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी अटकेत आहे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालवण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती त्यांनी दिली. तर थोड्यावेळीपूर्वी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी दोषींना कठोर शिक्षा देण्याचा उच्चार केला. हा केवळ गुन्हा नाही तर सामाजिक स्थितीचा प्रश्न असल्याचे ते म्हणाले. तरुण-तरुणी असे टोकाचे पाऊल का टाकतायेत यावर त्यांनी चिंता व्यक्त केली.

Follow Us
लालबागचा राजा ते साकीनाक्याचा... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
Ganpati Idol : लालबागचा राजा ते साकीनाक्याचा महाराजा; कुठे 45 अंशात झुकलेली मूर्ती, तर कुठे... मुंबईच्या गणपतींची अनोखी कलाकुसर
गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी...
Jalgaon : गणपतीची आरती मुस्लिम बांधवांनी केली, हिंदू बांधवांनी... जळगावात 1970 पासूनची राष्ट्रीय एकात्मतेची अनोखी परंपरा कायम
लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात विसर्जन मिरवणुकीला
Ganpati Visarjan : लालबागचा राजा ते दगडूशेठ हलवाई! मुंबई-पुण्यात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला लाखो भाविकांची गर्दी
ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! बाप्पाला निरोप
Ganpati Visarjan : ऊन-पावसाची पर्वा नाही, रस्त्यांवर भक्तांचा महासागर! मुंबई, पुणे, नाशिकमध्ये गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत