Ketan Murder Case: साहिल गोयल दबावात? 10 कोटींची नोटीस… वकिलांचा तो मोठा दावा, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात काय केला मोठा आरोप?

Ketan Agarwal Lohgad Murder Case: केतन अग्रवाल हत्याप्रकरणात आता एक मोठा मुद्दा समोर आला आहे. मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल अडचणीत सापडला आहे. त्याला 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. सियाचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी त्याच्यावर आरोप केले आहेत.

Ketan Murder Case: साहिल गोयल दबावात? 10 कोटींची नोटीस... वकिलांचा तो मोठा दावा, केतन अग्रवाल हत्या प्रकरणात काय केला मोठा आरोप?
सिया गोयल, साहिल गोयल, केतन अग्रवाल, आशुतोष श्रीवास्तव
Image Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 30, 2026 | 9:54 AM

Siya Goyal Sahil Goyal Ashutosh Srivastava : केतन अग्रवाल खूनप्रकरणात अजून एक मोठा मुद्दा समोर आला आहे. मुख्य संशयित आरोपी सिया गोयल हिचा भाऊ साहिल गोयल अडचणीत सापडला आहे. सियाचे वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी त्याला चुकीची माहिती दिल्याचे सांगत 10 कोटी रुपयांची कायदेशीर नोटीस बजावली आहे. साहिलने चुकीची माहिती दिल्याने त्याच्यावर नुकसान भरपाईसाठी ही कायदेशीर नोटीस बजावली आहे. काल न्यायालयात दोन्ही बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला. कोर्टात एकामागून एक धक्कादायक दावे-प्रतिदावे करण्यात आले. सुनावणीत हायहोल्टेज ड्रामा दिसून आला. तर दुसरीकडे साहिल गोयल गोत्यात आल्याचे दिसून येत आहे.

साहिलचा दावा काय?

वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणीदरम्यान सिया गोयलने “माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत,” असे सांगितल्याची माहिती साहिलने दिल्यानंतर वाद पेटला. साहिल गोयल याने आपल्याविरोधात खोटे, बिनबुडाचे आणि बदनामीकारक आरोप केले आहेत. आपल्या व्यावसायिक प्रतिष्ठेला धक्का पोहोचवला आहे. असा आशुतोष श्रीवास्तव यांनी केला आणि साहिलकडे 10 कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.

वकील आशुतोष श्रीवास्तव यांचा आरोप काय?

साहिल गोयल याला 10 कोटी रुपयांची नोटीस पाठवली आहे. ते चुकीचं बोलत आहेत. ते लोकांमध्ये गैरसमज पसरवत आहेत. सिया गोयल हिने वकिलनाम्यावर स्वाक्षरी, सही केली आहे. साहिल गोयल याला आम्ही ओळखत नाही. त्यांनी कुठला मेल केला नाही किंवा आमचं बोलणं झालं नाही. त्यांनी अस काही वक्तव्य करू नये, असे मत वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी केला आहे.

वकिलनामा बदलायचा असेल यासाठी एक प्रोसेस आहे. NOC साठी आम्हाला मेल आला नाही किंवा बोलणं झालं नाही. कोर्टात दिलेला वकालातनामा ऑन रेकॉर्ड आहे. साहिल गोयल याने माफी मागावी. त्यांनी बिनबुडाचे आरोप केले आहेत असे सांगावे. आमच्यात काही बोलणंच झालेलं नाही. उलट त्यांच्यावर दबाव आहे का? ते असं का बोलत आहेत? असा सवाल ॲडव्होकेट श्रीवास्तव यांनी विचारला. मुंबई हायकोर्टात प्रकरण गेल्यास सिया म्हणत असेल तर केस घ्यायची की नाही हे तेव्हा ठरवू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

साहिलने माफी मागावी

वकील आशुतोष श्रीवास्तव यांनी साहिल्या भूमिकेनंतर त्याला कायदेशीर नोटीस बजावली आहे. साहिलने केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा केला आहे. साहिलने आरोप मागे घेऊन सार्वजनिक माफी आणि भविष्यात असे आरोप न करण्याचे लेखी आश्वासन देण्याची मागणी त्यांनी बजावलेल्या नोटीसमध्ये केलेली आहे. आता या कायदेशीर नोटीसला साहिल गोयल काय उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Follow Us