पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा

| Updated on: Apr 17, 2021 | 8:11 PM

अगदी दोन महिन्यांपूर्वी सारं काही आलबेल होतं. घरातील प्रत्येक जण एकमेकांची काळजी घेत होता, पण एका बेसावध क्षणी घरात कोरोनाचा शिरकाव झाला.

पूजेनिमित्त एकत्र येणारं जाधव कुटुंब 15 दिवसात कोरोनाने संपवलं, पुणेकरांनो सावध व्हा
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

पुणे : अगदी दोन महिन्यांपूर्वी सारं काही आलबेल होतं. घरातील प्रत्येक जण गुण्या गोविंदाने राहत होता. एकमेकांची काळजी घेत होता, पण एका बेसावध क्षणी घरात कोरोनाचा शिरकाव झाला, अन काही समाजायच्या आता अवघ्या 15 दिवसांत एक संपूर्ण कुटुंब संपवलं. ही अतिशय दुर्दैवी तितकीच हृदयद्रावक घटना घडलीये पुण्यातील जाधव कुटूंबियांच्या बाबतीत (Know all about how Corona infection due to religious program destroyed a family from Pune).

अगदी काही महिन्यापूर्वी अख्खं कुटुंब एकत्र असलेल्या या कुटूंबियांच्या फक्त आठवणीच आता मागे उरल्यात. ही कहाणी आहे पुण्यातल्या येरवडा परिसरात राहणाऱ्या जाधव कुटुंबाची. काही दिवसांपूर्वी अगदी हसतं खेळतं असणारं हे कुटुंब आज होतं असं म्हणायची वेळ आली आहे. कारण या कुटुंबातले 4 जण पंधरा दिवसांमध्ये मृत्यूमुखी पडलेत. त्यांच्या मृत्यूचं कारण अर्थातच कोरोना आहे.

पूजेनिमित्त हे सगळं कुटुंब एकत्र, अन कोरोनाला निमंत्रण

15 जानेवारीला जाधव कुटुंबाचे प्रमुख शंकर जाधव यांना हृदयविकाराचा झटका आला अन त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर साधारण फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका पूजेनिमित्त हे सगळं कुटुंब एकत्र आलं अन कोरोनाला निमंत्रण मिळालं.

एकाला कोरोना संसर्ग आणि संपूर्ण कुटुंबच विळख्यात

या पुजेनंतरच कुटुंबातील एकानंतर एक जण पॉझिटिव्ह यायला सुरुवात झाली. सर्वात आधी जाधव यांची विवाहित मुलगीही कोरोना पॉझिटिव्ह आली. त्यानंतर पहिल्यांदा पॉझिटिव्ह आला तो धाकटा मुलगा 38 वर्षांचा रोहीत जाधव. त्या पाठोपाठ एक एक करत इतर सगळेच पॉझिटिव्ह आले. शहरातील परिस्थिती अगदी बिकट असताना पॉझिटिव्ह झालेल्या या सगळ्यांना ॲडमिट करायची वेळ आली तेव्हा मात्र प्रचंड धावपळ करावी लागणे साहजिकच होते.

बेडसाठी वणवण, रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनही संपला

रोहीत जाधवांना बाणेर कोव्हीड सेंटरला ॲडमिट केलं. दुसरा भाऊ 40 वर्षांचा अतुल कोथरुडच्या देवयानी रुग्णालयात. वैशालींची आई अलका जाधव विश्रातवाडीच्या रुग्णालयात दाखल होत्या. 28 मार्चला वैशाली यांना त्रास व्हायला लागला. वैशालीची ॲाक्सिजन पातळी कमी होती. त्यांना आधी भारती हॉस्पिटलला गेलो. तिकडे बेड मिळाला नाही म्हणून रुबीला नेलं, अन शेवटी ॲम्ब्युलन्समधला ॲाक्सिजन संपत आला, तेव्हा ड्रायव्हरने मदत केली आणि आम्ही त्यांना खेड शिवापुरच्या श्लोक रुग्णालयात दाखल केले. तिथे एक दिवस ठेवलं. प्रकृती सुधारतेय असं वाटतानाच दुर्दैवाने 30 मार्चला त्यांचा मृत्यू झाला.

पुणेकरांनो आता तरी सावध व्हा, अन नियमांचे पालन करा

3 एप्रिलला रोहित शंकर जाधव गेले. 4 एप्रिलला त्यांची आई अलका शंकर जाधव यांचे निधन झाले. तर 14 एप्रिलला 40 वर्षांच्या अतुल शंकर जाधव यांचाही मृत्यू झाला. आता मागे उरले आहेत ती रोहीत आणि अतुल यांच्या पत्नी, मुलं आणि वैशाली गायकवाडांचे कुटुंबीय. घरातले सगळे गेले, आधार नाही. अशात आता पुढे काय असा प्रश्न आज त्या संपूर्ण कुटुंबासमोर आहे. जाधवांचे संपूर्ण कुटुंब कोरोनाने केवळ 15 दिवसात उध्वस्त केलंय. तेव्हा पुणेकरांनो आता तरी सावध व्हा, अन नियमांचे पालन करा. कोरोना होत्याचं नव्हतं करतोय. त्याला हलक्यात नका घेऊ.

हेही वाचा :

पुण्यात कोरोनाने अख्खं कुटुंब संपवलं, 15 दिवसात सगळ्यांचा मृत्यू

Pune corona new guidelines : पुणेकरांसाठी महापालिकेकडून नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?

चंद्रकांतदादांची सूचना अजित पवारांना मान्य, आमदार निधीतून कोरोना खर्चासाठी 350 कोटी

व्हिडीओ पाहा :

Know all about how Corona infection due to religious program destroyed a family from Pune