Pune corona new guidelines : पुणेकरांसाठी महापालिकेकडून नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?

पुण्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्यातून सूट देण्यात आली आहे. तसे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. (Pune corona new guidelines)

Pune corona new guidelines : पुणेकरांसाठी महापालिकेकडून नवी नियमावली, काय सुरु, काय बंद?
corona lockdown
prajwal dhage

|

Apr 17, 2021 | 7:35 PM

पुणे : पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधक नियम लागू केलेले असूनसुद्धा येथे रोज हजारोंच्या संख्येने नवे रुग्ण आढळत आहेत. नव्या रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे येथे आरोग्य यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. या पार्श्वभूमीवर पुणे प्रशासनाने नवे नियम जारी केले आहेत. पुण्यात अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तींना कोरोना चाचणी करण्यातून सूट देण्यात आली आहे. तसे आदेश पुणे महापालिका आयुक्तांनी काढले आहेत. (Pune corona new guidelines issued by municipal commissioner covid19 new rules and regulation Maharashtra)

खानावळींना पार्सल सेवा देण्यास मुभा

या शिवाय मेस, मद्यविक्री आणि चष्म्याच्या दुकानांना अटींसह परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांना आता कोरोना चाचणीचे बंधन नसेल. पुण्यात खानावळींना पार्सल सेवेसाठी परवानगी देण्यात आली आहे. खानावळी आठवड्यातील सर्व दिवस सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत पार्सल सेवा देऊ शकतात.

मद्यविक्रीला होम डिलिव्हरी अटीवर परवानगी

पुणे पालिकेने मद्य विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, फक्त होम डिलिव्हरी करण्याच्या अटीवर ही परवानगी देण्यात आली आहे. नव्या नियमानुसार आता सोमवारी ते शुक्रवार सकाळी 17 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मद्य विकण्यास मुभा असेल.

चष्म्याच्या दुकानांना सुरू ठेवण्यास परवानगी

संचारबंदीच्या काळात मेडिकल, रुग्णालये वगळता इतर बहुतांश बाबींवर बंदी आणण्यात आली होती. यामध्ये चष्म्याची दुकानंसुद्धा बंद करण्यात आली होती. मात्र आता पालिकेच्या नव्या नियमांनुसार चष्याची दुकानं सोमवारी ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. या नव्या नियमांमुळे दृष्टीदोष असलेल्यांना दिलासा मिळाला आहे.

पुण्यात अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहणार

पुणे जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता वीकेंड लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवेतील दुकानं बंद राहतील, अशी माहिती पुण्याचे सह. पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली आहे. पुण्यात आता शनिवार आणि रविवारी फक्त मेडिकलची दुकान सुरु ठेवण्यास परवानगी आहे.

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा 

डॉ. रवींद्र शिसवे यांनी वीकेंड लॉकडाऊनबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बातचीत करताना जे लोक संचारबंदीचे नियम मोडतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा दिला आहे. पुणे पोलिसांच्या इशाऱ्याचा पुणेकर नागरिकांकवर किती परिणाम होतो, हे पाहावे लागणार आहे.

इतर बातम्या :

Pune Lockdown Update:पुण्यात कडक लॉकडाऊन, अत्यावश्यक सेवेची दुकानंही बंद, संचारबंदी तोडणाऱ्यांवर कारवाईचा पोलिसांचा इशारा

एकापाठोपाठ एक मृतदेह, सोलापुरातल्या स्मशानभूमीत राखेचा खच, मन सुन्न करणारं चित्र!

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, 139 मेट्रिक टनची मागणी, हातात फक्त 87 टन, छगन भुजबळ यांची माहिती

(Pune corona new guidelines issued by municipal commissioner covid19 new rules and regulation Maharashtra)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें