कोल्हापूर-मुंबई सेवा सुरु होत असताना विमानतळ भूसंपादनाचा वाद चिघळणार

| Updated on: Mar 26, 2023 | 8:06 AM

कोल्हापूर विमानतळासाठीचे विस्तारीकरण केले जात आहे. त्यासाठी जमीन संपादनाचे काम सुरु आहे. आता राहिलेल्या तेरा हेक्टर जमिनीचे भूसंपादन केलं जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनाला पाठवला आहे.

कोल्हापूर-मुंबई सेवा सुरु होत असताना विमानतळ भूसंपादनाचा वाद चिघळणार
Follow us on

भूषण पाटील, कोल्हापूर : कोल्हापूर-मुंबईवरुन प्रवासाचा नवा मार्ग आता जास्त दिवस सुरु राहणार आहे. आता कोल्हापूरवरुन मुंबई आणि मुंबईवरुन कोल्हापूरला विमानाने जाता येणार आहे. यामुळे मुंबईकरांना महालक्ष्मीचे दर्शन घेऊन एका दिवसांत कोल्हापूरवरुन पुन्हा मुंबई गाठता येणार आहे. ही विमानसेवा 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे. आठवड्यातून चार दिवस विमानसेवा असणार आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी कोल्हापूर मुंबई विमान सेवा असणार आहे. स्टार एअरवेजच्या माध्यमातून ही सेवा आधी आठवड्यातून दोन वेळा दिली जात होती.

काय आहेत वेळा


स्टार एअरवेजच्या विमानाच सकाळी साडेदहा वाजता मुंबईतून होणार टेकऑफ होणार आहे. त्यानंतर तासाभरात हे विमान कोल्हापूरला पोहचणार आहे. तर कोल्हापूरहून मुंबईसाठी सकाळी 11.55 वाजता विमानाचे टेक ऑफ होणार आहे अन् मुंबईत 12 वाजून 55 मिनिटांनी लँडिंग होणार आहे.

हे सुद्धा वाचा

जागेचा वाद चिघळणार


कोल्हापूर विमानतळासाठीच्या तेरा हेक्टर जमिनीचे भूसंपादन केलं जाणार आहे. यासाठीचा प्रस्ताव महाराष्ट्र विमान प्राधिकरणाने जिल्हा प्रशासनाला पाठवला आहे. कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणासाठी सध्या भूसंपादनाचे काम सुरू आहे. दहा हेक्टरहुन अधिक जमिनीचे संपादन झालेला आहे.

मात्र अनेक जमीन धारकांनी ज्यादा मोबदल्याची मागणी करत भूसंपादनाला विरोध केला.विरोध होणाऱ्या या 13 हेक्टर जमिनीच आता सक्तीने संपादन होण्याची शक्यता आहे. जमीन संपादित करण्यासाठी विमान प्राधिकरणाकडून आता जमीन संपादन होणार असल्याने त्याला विरोध देखील होणार आहे.. त्यामुळे कोल्हापूर विमानतळासाठीच्या जमीन भूसंपादनाचा वाद चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत.

कोल्हापूरवरुन या ठिकाणी सेवा


कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टी विस्तारीकरण केले जात आहे. या ठिकाणावरु नाईट लँडिंग, टॅक्सी पार्किंग आदी सुविधा सुरू झाल्या आहेत. कोल्हापूरवरून अहमदाबादमार्गे दिल्ली, बंगळूर, हैदराबाद, तिरुपती आदी विमानसेवा सुरू आहेत. आता कोल्हापूर-मुंबई मार्गावर ५ एप्रिलपासून विमानसेवा चार दिवस सुरू होत आहे.

आजपासून पुणे-मुंबई प्रवास फक्त एका तासात, पाहा वेळ अन् तिकीट दर…वाचा सविस्तर