कराडच्या विद्यार्थ्यांचं भन्नाट संशोधन, डॉक्टरांसाठी एअर कंडिशनिंग आरामदायी पीपीई किटची निर्मिती

| Updated on: Feb 23, 2021 | 12:36 PM

कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयानं संयुक्त संशोधन करत पुनर्वापर करता येणारे पीपीई किट तयार केले आहे. (Karad Air Conditioning PPE Kit)

कराडच्या विद्यार्थ्यांचं भन्नाट संशोधन, डॉक्टरांसाठी एअर कंडिशनिंग आरामदायी पीपीई किटची निर्मिती
एअर कंडिशनर पीपीई किट
Follow us on

सातारा: कराडच्या कृष्णा वैद्यकीय संशोधन संचालनालय व शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने पुनर्वापर करता येणारे वातानुकूलित पीपीई किटचे यशस्वी संशोधन केले आहे. कोरोनासह संसर्गजन्य आजारांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर कर्मचाऱ्यांना नवीन पीपीई किट आरामदायी व सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले असल्याची माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत देण्यात आली. (Krishna Deemed University and Government Engineering College invented air conditioning reusable PPE Kit)

प्रचलित पीपीई किटमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांची दमछाक

कोरोनासह जगभर अनेक प्रकारच्या विषाणूजन्य साथीच्या रोगांचा धोका दिवसेंदिवस वाढत चालला आहे. हा संसर्ग टाळण्यासाठी संबंधित आजारावर उपचार करताना डॉक्टर्ससह आरोग्य कर्मचाऱ्यांनी पीपीई कीट घालणे अनिवार्य आहे. मात्र, असा पीपीई कीट सलग 6-6 तास घालून सेवा देणे डॉक्टरांसाठी मोठे त्रासाचे ठरते. कारण पूर्णपणे पॅकबंद असलेल्या पीपीई कीटमध्ये हवेचे योग्य संतुलन होत नसल्याने घामेजलेल्या अवस्थेत सेवासुश्रुषा करावी लागेत. डॉक्टर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांची प्रचलित पीपीई किट वापरातना मोठी दमछाक होते, तसेच त्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

कृष्णा अभिमत विद्यापीठ आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संयुक्त संशोधन

आरोग्य कर्मचाऱ्यांचा हा त्रास कमी व्हावा यासाठी पीपीई कीटमध्ये हवा खेळती ठेवणाऱ्या उपकरणाचे संशोधन करण्यात आले आहे. कराड येथील कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे संशोधन संचालनालय आणि शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्या संयुक्त प्रयत्नातून संशोधित करण्यात आलेल्या या अनोख्या उपकरणामुळे पीपीई कीटमध्ये हवा खेळती राहणार आहे. संबंधित पीपीई कीट परिधान करणाऱ्या डॉक्टरांच्या शरीराचे तापमान सामान्य राहण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पीपीई कीटचा वापर त्यांच्यासाठी सुसह्य ठरणार आहे. मुख्य म्हणजे या उपकरणात 0.1 मायक्रॉन आकाराचा हेपा फिल्टर बसविण्यात आला आहे. कोविड-१९ चा विषाणू हा यापेक्षा मोठ्या आकाराचा असल्याने त्याचा शिरकाव या उपकरणाद्वारे पीपीई कीटमध्ये होऊ शकत नाही.

वजनाला हलके

हे उपकरण वजनाला हलके असून, हाताळण्यास सोपे आहे. त्यामुळे डॉक्टरांसह नर्सेस, वॉर्ड बॉय व अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांना हे उपकरण आरामदायी पद्धतीने वापरता येणार असून, विषाणूजन्य साथीच्या आजारांच्या काळात उपचार करताना हे उपकरण त्यांच्यासाठी महत्वपूर्ण ठरणार आहे, असं शासकीय अभियांत्रिकी महाविद्याल्याच्या निखील भिसे या संशोधक विद्यार्थ्यानं सांगितले.

कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी सातत्याने समाजपयोगी संशोधनाला चालना दिली असून, आरोग्य क्षेत्रातील संशोधनाचा लाभ सामान्यातील सामान्य नागरिकाला व्हावा यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाच्या संशोधन संचालनालयाने विविध प्रकारची संशोधने केली असून, त्यांची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहेत. कृष्णा अभिमत विद्यापीठाचे अतिरिक्त संशोधन संचालक डॉ. डी. के. अग्रवाल, यांनी ही माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत दिली.

संबंधित बातम्या :

कोरोना लसीच्या प्रभावावर प्रश्नचिन्ह? लस घेऊनही IAS कौस्तुभ दिवेगावकर कोरोना पॉझिटिव्ह, उस्मानाबादेत खळबळ

आता हाफ तिकीट विमानप्रवास, एअर इंडियाचं ज्येष्ठ नागरिकांना मोठं गिफ्ट

Air India Recruitment 2021: परीक्षा न देता मिळवा एअर इंडियामध्ये नोकरी, असं करा अप्लाय

Viral Video : लग्न समारंभात तंदुर बनवणाऱ्यानं असं काही केलं की तुम्ही शिव्या घालाल!

(Krishna Deemed University and Government Engineering College invented air conditioning reusable PPE Kit)