ललित पाटील प्रकरणानंतर पुणे ससून रुग्णालयाला मिळाला नवीन कॅप्टन

pune lalit patil and sanjeev thakur | ललित पाटील याचे ड्रग्स तस्करीचे प्रकरण पुणे पोलिसांनी उघड केले. त्यानंतर तो ससूनमधून फरार झाला होता. या प्रकरणानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर चौफेर टीका होऊ लागली होती. आता ससूनमध्ये त्यांच्या जागी नवीन कॅप्टन मिळाला आहे.

ललित पाटील प्रकरणानंतर पुणे ससून रुग्णालयाला मिळाला नवीन कॅप्टन
| Updated on: Nov 30, 2023 | 12:00 PM

अभिजित पोते, पुणे, दि. 30 नोव्हेंबर 2023 | ड्रग्स माफिया ललित पाटील प्रकरणामुळे पुणे येथील ससून रुग्णालय चांगलेच चर्चेत आले आहे. ड्रग्स तस्करीत अटक झालेल्या ललित पाटील याच्या तीन वर्षातील कारागृह कारकीर्दीपैकी तब्बल नऊ महिने ससून रुग्णालयात गेले होते. ललित पाटील याचे ड्रग्स तस्करीचे प्रकरण पुणे पोलिसांनी उघड केले. त्यानंतर तो ससूनमधून फरार झाला. तब्बल पंधरा दिवस तो फरार होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर ससूनमधील एक, एक प्रकरण बाहेर येऊ लागले. एखाद्या कैद्यावर ससून रुग्णालयाचे डीन उपचार करीत असल्याचे समोर आले. त्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यासंदर्भात विरोधकांनी टीका सुरु केली. शेवटी मॅटचा आदेश आल्यानंतर डॉक्टर संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई झाली. आता ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची निुयक्ती वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे.

डॉ. विनायक काळे यांच्याकडे ससूनची सूत्र

ससूनच्या अधिष्ठातापदी पुन्हा एकदा डॉ. विनायक काळे यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण विभागाने केली आहे. बुधवारी रात्री उशिरा त्यांची ऑर्डर काढण्यात आली आहे. त्यामुळे विनायक काळे पुन्हा ससूनमध्ये बॅक टू पॅव्हेलीयन येणार आहे. गुरुवार ससूनच्या अधिष्ठाता पदाचा पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. डॉक्टर विनायक काळे ससूनमधील बिघडलेले प्रशासन कितीपत सुरळीत करतील, याकडे आता लक्ष लागले आहे.

ललित पाटील यांचा आणखी एक सीसीटीव्ही

ललित पाटील यांचा आणखी एक सीसीटीव्ही समोर आला आहे. ललित पाटील ज्या दिवशी रुग्णालयातून पळून गेला, त्या दिवशीचा हा सीसीटीव्ही आहे. एका सोसायटीमधून ललित पाटील एकटाच बाहेर पडला. तोंडाला मास्क लावून ललित पाटील बाहेर पडत असल्याचे त्यात दिसत आहे. ललित पाटील प्रकरणात अटक केलेले आरोपी हरीश पंत, अरविंद लोहारे, इब्राहिम शेख यांचे बँक डिटेल्स पोलिसांना मिळाले आहे. आता पुणे पोलीस त्यांच्या मालमत्तेची तपासणी करणार आहे. बुधावारी या सर्वांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले.