लेकीला पोलीस बनवण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आला; काळाने केला असा घात

पालक रस्त्यावर फुटपाथवर झोपताना देखील पाहायला मिळत आहेत. यामुळेच वेगवेगळ्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. आज पुण्यामध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे.

लेकीला पोलीस बनवण्याचं स्वप्न घेऊन पुण्यात आला; काळाने केला असा घात
| Edited By: | Updated on: Mar 13, 2023 | 11:17 AM

पुणे : गेल्या काही दिवसांपासून पोलीस भरतीला सुरुवात झाली. मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून युवक-युवती पुण्यामध्ये येत आहेत. त्यांच्यासोबत त्यांचे पालक देखील येत आहेत. अनेकदा आपण पाहिले की या पोलीस भरतीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या आणि त्यांचे पालकांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. हे पालक रस्त्यावर फुटपाथवर झोपताना देखील पाहायला मिळत आहेत. यामुळेच वेगवेगळ्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. आज पुण्यामध्ये देखील अशीच धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या लाडक्या लेकीला पोलीस व्हायचं स्वप्न होतं. आपल्या लेकीला पोलीस भरतीसाठी पुण्यामध्ये घेऊन आलेल्या एका व्यक्तीवर काळाने घाला घातलेला आहे.

फुटपाथवर केला मुक्काम

सुरेश सखाराम गवळी वय 55 यांची लेक ज्योती गवळी ही पोलीस भरतीसाटी गेल्या अनेक दिवसांपासून प्रयत्न करते. पोलीस भरतीची तारीख कळले.  सुरेश गवळी आणि त्यांची लेक ज्योती गवळीला नाशिकहून पुण्याला आले. काल रात्री पुण्यामध्ये उतरल्यानंतर त्यांनी पुण्यातल्या शिवाजीनगर परिसरातील फुटपाथवर मुक्काम देखील केला.

अज्ञात वाहनाने सुरेश यांना उडवलं

पहाटे दोनच्या दरम्यान मुलीचे ग्राउंड असल्याने मुलीला ग्राउंडवर सोडायला देखील गेले. मुलीला रात्री ग्राउंडवर सोडल्यानंतर शिवाजीनगर परिसरातून हॉटेल प्राईडच्या दिशेने चहा पिण्यासाठी म्हणून सुरेश गवळी निघाले. तेवढ्यात काळाने त्यांच्यावरती घाला केला. समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने सुरेश गवळी यांना उडवलं आणि यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचालकाचा शोध सुरू

याबाबतचा अधिक तपास आता शिवाजीनगर पोलीस करत आहेत. शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी अर्जुन नाईकवाडे हे तपास अधिकारी म्हणून काम करतायेत. सीसीटीव्हीच्या माध्यमातून वाहनचालकाचा शोध सुरू आहे. सध्या अज्ञात वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.