Video | अंगणात पडली वीज, लोकांना विजेचे झटके, नारळाच्या झाडानेही पेट घेतला, घटना कॅमेऱ्यात कैद

| Updated on: May 30, 2021 | 5:40 PM

मुसळधार पावसामध्ये एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली आहे. या घटनेमध्ये भर पावसामध्ये नारळाच्या झाडाला आग लागली आहे. (pune lightning hits coconut tree)

Video | अंगणात पडली वीज, लोकांना विजेचे झटके, नारळाच्या झाडानेही पेट घेतला, घटना कॅमेऱ्यात कैद
PUNE PURANDAR LIGHTNING
Follow us on

पुणे : राज्यात सध्या बहुतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पाऊस बरसतोय. काही ठिकाणी विजासुद्धा कडाडत आहेत. पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावामध्ये पावसाचे रौद्र रुप पाहायला मिळाले आहे. या गावात मुसळधार पावसामध्ये एका नारळाच्या झाडावर वीज कोसळली आहे. या घटनेमध्ये भर पावसामध्ये नारळाच्या झाडाला आग लागलीये. विशेष म्हणजे झाडावर वीज कोसळल्यानंतर त्याचा झटका थेट आजूबाजूच्या लोकांनासुद्धा बसला आहे. या घटनेचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद झालाय. (lightning hits coconut tree in Pune Purandar incident caught in camera)

नेमकं काय घडलं ?

सध्या अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचे मोठे नुकसान झालेय. पुरंदर तालुक्यातील गुळूंचे गावातसुद्धा असाच मुसळधार पाऊस झालाय. या पावसामध्ये एका घरासमोरील नारळाच्या झाडावर अचानकपणे वीज कोसळलीये. वीज कोसळल्यामुळे नारळाच्या उभ्या झाडाने भर पावसात पेट घेतला आहे.

लोकांना विजेचा झटका, दैव बलवत्तर म्हणून जीवितहानी नाही

गुळूंचे गावामध्ये नारळाच्या झाडावर वीज कोसळत असताना बाजूच्या घरात काही ग्रामस्थ थांबलेले होते. यावेळी वीज कोसळताच या लोकांनासुद्धा त्याचा झटका बसला. एकीकडे झाडाने पेट घेतला तर दुसरीकडे लोकांना विजेचा धक्का बसला. हा सर्व प्रकार गावातील संजय निगडे यांनी आपल्या मोबाईल कॅमेरात टिपला आहे.

पाहा व्हिडीओ :

दरम्यान, या घटनेमध्ये नारळाच्या झाडासोबतच अंगणातील तुळशी वृंदावनसुद्धा जळाले आहे. नारळाच्या झाडाच्या बाजूला घरात बसलेल्या लोकांचे दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला. या घटनेत कोणतीही जीवितहीना झालेली नाही.

इतर बातम्या :

Weather alert: उकाड्यापासून सुटका होणार; राज्यात पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसणार

पीक विम्याचा प्रश्न पेटला, अकोल्यात शेतकरी आक्रमक; विमा कंपनी व कृषी सहायकाविरुद्ध पोलिसात तक्रार

Onion Price Today: कांद्याचा दर 2200 रुपयेपर्यंत पोहोचला, गेल्यावर्षी मे महिन्यात दर किती होता?

(lightning hits coconut tree in Pune Purandar incident caught in camera)