Weather alert: उकाड्यापासून सुटका होणार; राज्यात पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसणार

आनंदाची बातमी. दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज आहे. | Pre monsoon rain

Weather alert: उकाड्यापासून सुटका होणार; राज्यात पुढील चार दिवस मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसणार
मुंबईसह महाराष्ट्रात तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता
Follow us
| Updated on: May 30, 2021 | 7:57 AM

पुणे: सध्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या राज्यातील नागरिकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण उद्यापासून राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाला (Rain) सुरुवात होण्याची शक्यता आहे. पुणे वेधशाळेने तसा इशारा दिला आहे. (Pre monsoon rain expected in Mumbai, Pune, Konkan)

पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे बाष्प जमा झाले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पुढील चार दिवस पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच दोन जूनपर्यंत राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पाऊस बरसेल, असा अंदाज आहे.

पुण्यात मुसळधार पाऊस

पुणे शहरात शनिवारी तब्बल तीन तास मुसळधार पाऊस पडला. हवामान विभागाकडून शनिवारी सकाळीच तसा इशारा देण्यात आला होता. हा अंदाज तंतोतंत खरा ठरला.

मान्सून दोन दिवसात केरळमध्ये

भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, मान्सूनवर यास चक्रिवादळाचा सकारत्मक परिणाम झाल्यानं यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल

महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?

सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणे 9-10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

Yaas Cyclone: महाराष्ट्रालाही ‘यास’चा फटका बसणार; आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता

Weather update : पुढील तीन तासात पुणे, सांगली, सोलापुरात जोरदार पावसाचा अंदाज

(Pre monsoon rain expected in Mumbai, Pune, Konkan)

Non Stop LIVE Update
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.