Pune MNS : मनसे ठाम..! पुण्यातल्या खालकर मारुती मंदिरात अकरा वाजता होणार महाआरती, पोलिसांनी बजावली नोटीस

राज ठाकरेंचा आदेश हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, असा पवित्रा आता मनसैनिकांनी दिला आहे. तर आता राज ठाकरेंनी पत्र लिहित परखड आणि आक्रमक पवित्राही स्पष्ट केला आहे. तर महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत.

Pune MNS : मनसे ठाम..! पुण्यातल्या खालकर मारुती मंदिरात अकरा वाजता होणार महाआरती, पोलिसांनी बजावली नोटीस
पुण्यात मशिदींबाहेर पोलिसांचा बंदोबस्त
Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 9:36 AM

पुणे : मनसेच्या वतीने पुण्यातील खालकर मारुती मंदिरात (Khalkar marutu mandir) सकाळी 11 वाजता महाआरती करण्यात येणार आहे. पुणे पोलिसांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांसह आठशे कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजावल्यानंतरसुद्धा महाआरती (Maha aarti) होणारच, या भूमिकेवर मनसे पदाधिकारी ठाम आहेत. सकाळी 11 वाजता खालकर मारुती मंदिरात महाआरती झाल्यानंतर बारा वाजता कोथरूडमध्ये महाआरती होईल. या सगळ्याच्या पार्श्‍वभूमीवर मंदिराच्या बाहेर पोलीस (Police) बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यभरातील परिस्थितीही वेगळी नाही. मनसे कार्यकर्त्यांची धरपकड पोलिसांकडून सुरू आहे. काही मनसे कार्यकर्ते तर थेट नॉट रिचेबल गेले आहेत. मात्र काही मनसे कार्यकर्ते हे आरती करण्यावर आणि हनुमान चालिसा लावण्यावर अजूनही ठाम आहे. त्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या आहेत.

‘राज ठाकरेंचा आदेश महत्त्वाचा’

राज ठाकरेंचा आदेश हा आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे, असा पवित्रा आता मनसैनिकांनी दिला आहे. तर आता राज ठाकरेंनी पत्र लिहित परखड आणि आक्रमक पवित्राही स्पष्ट केला आहे. दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात औरंगाबाद पोलिसात गुन्हा दाखल झाल्याने राज ठाकरे यांना अटक होऊ शकते अशा चर्चा सुरू आहे. अशात पुणे मनसेचे अध्यक्ष साईनाथ बाबर आणि त्यांनी इशारा देत केलेले ट्विट सध्या चांगलेच चर्चेत आहे. महाविकास आघाडीचे नेते राज ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. तर दुसरीकडे भाजपा नेते राज ठाकरेंचं समर्थन करत आहेत.

राज ठाकरेंकडून पुन्हा एक ट्विट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल एक ट्विट केले होते. हिंदी भाषेतले हे एक पत्र त्यांनी ट्विट करत आवाहन केले होते. त्यात त्यांची भूमिका ठाम होती. आता पुन्हा त्यांनी एक ट्विट केले आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची एक क्लिप त्यांनी ट्विट केली आहे. त्यावेळी आमचे सरकार आल्यास रस्त्यावरचे नमाज बंद केल्याशिवाय राहणार नाही. धर्माचा उपद्रव होता कामा नये. मशिदींवरचे लाऊडस्पीकर खाली येतील, असे त्यात बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटले होते.