AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुणे विद्यापीठात अभाविपचा राडा, आंदोलकांवर गुन्हा दाखल, नंतर राज्यपालांचं कुलगुरुंना पत्र

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज मोठा राडा झाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार आंदोलन केलं. यावेळी आंदोलकांनी व्यवस्थापन परिषदेची बैठक उधळून लावली. या आंदोलनाचे व्हिडीओदेखील समोर आले आहेत. या घटनेची दखल आता थेट राजभवानाकडून घेण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठात अभाविपचा राडा, आंदोलकांवर गुन्हा दाखल, नंतर राज्यपालांचं कुलगुरुंना पत्र
| Edited By: Chetan Patil | Updated on: Apr 24, 2023 | 11:49 PM
Share

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात घडलेल्या राड्याची गंभीर दखल राजभवनाकडून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या राड्याप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 15 ते 20 आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याची माहिती नुकतंच समोर आलेलं. त्यानंतर राजभवनाकडून या घटनेची गंभीर दखल घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अभाविपने विद्यापीठात घातलेला राडा आणि रॅप साँग प्रकरणाचा तात्काळ अहवाल सादर करण्याचे निर्देश राजभवनाने दिले आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांनी या प्रकरणी विद्यापीठाच्या कुलगुरुंना पत्र पाठवलं आहे. या पत्रात संबंधित प्रकरणाचा अहवाल सादर करण्यात आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतर पुणे विद्यापीठ उद्या दुपारपर्यंत राजभवनला अहवाल सादर करणार आहे. विशेष म्हणजे याबाबत ‘टीव्ही 9 मराठी’ने प्रदर्शित केलेल्या बातमीची दखल राजभवनाकडून घेण्यात आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील गाण्याचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ आज अखिल भारतीय विद्यार्थी परिदषदेच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठात जोरदार आंदोलन केले. अभाविपच्या कार्यकर्त्यांनी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घुसून जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर या आंदोलकांनी कागदपत्रे फाडून ते उधळतानाच विद्यापीठातील दरवाजे आणि खिडक्यांच्या काचाही फोडल्या.

विद्यार्थ्यांनी अचानक केलेल्या या राड्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली. राड्यामुळे कुलगुरुंनाही बैठक थांबवावी लागली. तब्बल तासभर या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. पुणे विद्यापीठात आज विद्यापीठ व्यवस्थापनाची बैठक सुरू होती. कुलगुरुंच्या अध्यक्षतेखाली सुरू असलेल्या या बैठकीला सिनेटचे सदस्यही उपस्थित होते. बैठक सुरू असतानाच अचानक घोषणाबाजीचा आवाज आला.

काही कळायच्या आत अभाविपच्या कार्यकर्त्यांची झुंडच्या झुंड बैठकीच्या ठिकाणी शिरली. कुलगुरुंशी कोणतीही चर्चा न करता या आंदोलकांनी तोडफोड करण्यास सुरुवात केली. खिडक्यांच्या काचा फोडल्या. दरवाजाच्या काचा फोडल्या. कागद फाडून तेही उधळले. ही तोडफोड करत असताना आंदोलक जोरदार घोषणाबाजी देत होते. अश्लील गाण्याचं चित्रीकरण करण्यास परवानगी दिल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं. त्यामुळे विद्यापीठात एकच खळबळ उडाली.

आता पुढे काय होणार?

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून या प्रकरणी अहवाल सादर करण्यात आल्यानंतर राज्यपालांच्या भूमिकेला जास्त महत्त्व असणार आहे. राज्यपाल या प्रकरणी नेमके काय निर्देश देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अश्लील गाण्याचं चित्रीकरण करण्यात आल्याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाला राज्यपाल जाब विचारतात की, आक्रमक आंदोलन केल्याप्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले जातात, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?