HSC SSC Exam : ठरलं, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती

| Updated on: Feb 18, 2022 | 6:28 AM

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे.

HSC SSC Exam : ठरलं, दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन होणार, बोर्डाच्या अध्यक्षांची माहिती
शरद गोसावी
Follow us on

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यावतीनं दहावी (SSC Exam) आणि बारावीच्या (HSC) परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार आहे. बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी (Sharad Gosavi) यांनी ही माहिती दिली आहे. प्रात्याक्षिक परीक्षा दोन कालावधीत घेण्यात येणार असल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनंच होणार हे आता निश्चित झालं आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेतचं परीक्षा देता येणार आहे. मुख्याध्यापक, विषयतज्ञ यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात आले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. बारावीच्या लेखी परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परीक्षा  15 मार्च ते 4 एप्रिल या काळात होतील.

बारावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्याकडून बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 30 मार्च या कालावधीत घेण्यात येतील. प्रात्याक्षिक परीक्षा, श्रेणी परीक्षा 14 फेब्रुवारी ते 3 मार्च मध्ये होतील. कोरोना आणि इतर कारणामुळं अडचण आल्यास 31 मार्च ते 18 एप्रिल या कालावधीत प्रात्यक्षिक परीक्षा होतील. दुसऱ्या टप्प्यातील परीक्षेसाठी कोरोनोमुळं मंडळ परीक्षा शुल्क आकारणार नाही.

दहावीच्या लेखी आणि प्रात्याक्षिक परीक्षा

दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत घेण्यात येणार आहेत. प्रात्याक्षिक, तोडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 3 मार्च या कालावधीत परीक्षा होईल. काही कारणामुळं प्तात्याक्षिक परीक्षा देता आली नाही तर 5 एप्रिल ते 22 एप्रिल पर्यंत होतील. मंडळाच्या परीक्षा ठरलेल्या काळातचं होतील.

दहावी बारावीसाठी किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली?

मंडळाकडे दहावीसाठी 16 लाख 25 हजार 311 अर्ज आले आहेत. तर बारावी 14 लाख 72 हजार 562 अर्ज आल्याची माहिती शरद गोसावी यांनी दिली. आपल्या मंडळाच्या परीक्षेचं स्वरुप हे वस्तूनिष्ठ, लघूत्तरी आणि दिर्घोत्तरी असं असतं. बारावीसाठी आपल्याकडे 158 विषय असतात. विज्ञान शाखेसाठी 4 माध्यमातून परीक्षा होते. कला आणि वाणिज्य माध्यमातून 6 माध्यमातून परीक्षा होते. 158 विषयांसाठी 356 प्रश्न पत्रिका असतात. दहावीसाठी 7 विषय आणि 8 माध्यम असतात त्याच्या 158 प्रश्नपत्रिका असतात. राज्यात पावणे दोन लाख कर्मचारी परीक्षा घेतात.

स्वत:च्या शाळेत परीक्षा देण्याची संधी

कोरोनामुळं या वर्षी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शाळा तिथं परीक्षा उपकेंद्र घेण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. विद्यार्थी ज्या शाळेत शिकतो तिथंच परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांना तणावाशिवाय परीक्षेला सामोरं जाता येतं. ज्या शाळेत 15 पेक्षा कमी विद्यार्थी असतात तिथं जवळच्या शाळेत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र देण्यात येईल. 40 ते 60 गुणांच्या परीक्षेसाठी 15 मिनिटं जादा वेळ, 70 ते 100 गुणांच्या परीक्षांसाठी अर्धा तास अधिक देतोय. परीक्षेचा पेपर 10.30 वाजता सुरु होईल. विद्यार्थ्यांच्या हातात 10.20 आणि दुपारच्या सत्रात 2.50 वाजता प्रश्नपत्रिका देण्यात येईल. नियमित परीक्षा पद्धतीवेळी असतात त्यापेक्षा चार पट केंद्र निश्चित करण्यात आली आहेत, असं शरद गोसावी म्हणाले.

लेखी परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर

लेखी परीक्षा 75 टक्के अभ्यासक्रमावर आधारीत असेल. 25 टक्के अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. परीक्षा 15 दिवस उशिरानं सुरु करण्यात येणार आहेत. दहावीची परीक्षा 15 मार्चपासून सुरु होत आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी आणि शिक्षकांना अध्यापनासाठी वेळ मिळेल. प्रात्यक्षिक परीक्षा ही किमान 40 टक्के अभ्यासक्रमावर आधारित होणार आहेत. अंतर्गत आणि बहिस्थ परीक्षक संबंधित शाळेतीलचं असणार आहेत.

लेखी परीक्षा सुरु असताना विद्यार्थ्याला वैद्यकीय त्रास झाल्यास स्वतंत्र कक्षात त्याची व्यवस्था करण्यात येईल. शासकीय आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांना बोलवून उपचार केले जातील आणि तिथं त्याला परीक्षा देता येईल. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झिक झॅक पद्धतीनं एका वर्गात 25 विद्यार्थी बसतील.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या: 

Maharashtra HSC SSC exam schedule 2022 : दहावी बारावीच्या परीक्षांचं सविस्तर विषयनिहाय वेळापत्रक जाहीर, वाचा एका क्लिकवर

HSC SSC Exam : दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष द्यावं, बोर्डाकडून काही गोष्टी करण्यात येणार : वर्षा गायकवाड

Maharashtra HSC SSC exam board President Sharad Gosavi said exam conduct offline mode